जास्त प्रमाणात एअरफोन्सचा वापर करत असाल तर, वेळीच व्हा सावध !


सध्याच्या काळात प्रत्येकाकडे फोन हा असतोच मग तो स्मार्टफोन असो किंवा साधा फोन असो. संगीताची आवड ही प्रत्येकाला असतेच त्यामुळे मोबाइलमधून गाणी ऐकण्यासाठी एअरफोन्सचा वापर सर्रास केला जातो. एअरफोन्सने गाणी ऐकण्यास किंवा कॉल वर बोलण्यास सोपे जाते. पण सततच्या एअरफोन्सच्या सततच्या वापराने काही समस्या निर्माण होऊ शकतात.

तांत्रिक प्रगती ही एक वरदान आणि अभिशाप दोन्ही आहे. एक आयुष्य सोपे झाले सुविधा झाल्या मात्र त्यात काही कमतरता आहेत आणि त्याचा वाईट परिणामही होतो. तांत्रिक गोष्टीतील महत्त्वाची गोष्ट इअरफोन किंवा हेडफोनच्या परिणामांविषयी सांगणार आहोत. इयरफोन्स वाईट परिणाम पाहून किंवा लक्षात घेऊन आपल्या सवयींमध्ये काही सुधारणा करून घेतल्या पाहिजे. दीर्घ कालावधीसाठी हेडफोनचा वापर केल्यास काय नुकसान होते ते बघूया.

रात्रीच्या वेळी हेडफोन वापरू नका : कुठेही गेला असताना हेडफोन्स आवाज हा साठ टक्क्यांच्या आसपास ठेवावा त्यामुळे आजूबाजूचे आवाज थोड्याफार प्रमाणात ऐकू येतात. जर दोन तीन फूट लांब असलेल्या व्यक्तीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नसेल तर आवाज कमी करावा. सतत दोन तासांपेक्षा अधिक काळ हेडफोन्स लावू नये. खूप आधीक काळ लावायचे असतील तर मधून मधून त्यांना आराम मिळेल असे पाहावे. विमान प्रवास करताना ब्लूटूथ हेडफोन्सचा वापर करण्यापूर्वी परवानगी जरूर घ्यावी. असे एअरफोन्स निवडायचे जे कानाच्या खूप आत जाणार नाहीत. बाहेरच्या बाजूला राहतील. रात्रीच्या वेळी इयरफोन लावून झोपू नये. त्यामुळे कानाचे नुकसान होऊ शकते.

कानदुखी : जास्त प्रमाणात एअरफोन्सचा वापर केल्यास कानदुखी होऊ शकते. वेळेस एअरफोन्सची वापरण्याची सवय कमी न केल्यास त्याचे धोकादायक परिणाम होऊ शकतात.

बहिरेपण : एखादा विशिष्ट क्षमतेपर्यंत ऐकण्याची क्षमता आपल्या कानातं असते. कान केवळ 65 डेसिबल आवाज सहन करू शकतात. मात्र आपण सातत्याने एअरफोन्सचा वापर केल्यास बहिरेपण येण्याची शक्यता असते.

झोप कमी होणे : झोप न येणे, मानसिक ताण, नैराश्य आणि सतत होणारी डोकेदुखी याचे कारण सतत वापरले जाणारे हेडफोन्स असू शकते. त्यामुळेच खूप जास्त काळ हेडफोन्सचा वापर करू नये.

कानात मळ : दहा मिनिटांपर्यंत इअरफोन्स कानात लावून ठेवल्यास कानातल्या पेशी मरतात. त्यामुळे जिवाणूंची वाढ सातत्याने होते आणि कानात मळ साठतो.

मेंदूचे नुकसान : हेडफोनमधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय तरंग मेंदूला खूप नुकसान पोहोचवू शकतात. काही व्यक्तींना रात्री झोपताना गाणी ऐकायची सवय असते. या सवयीचा मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो.

अपघाताची शक्यता : अनेकदा गाडी चालवताना किंवा रस्ता ओलांडताना कानात हेडफोन्स असतात. त्यामुळे इतर वाहनांचा आवाज ऐकाला येत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याचा संभव असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी करताना हेडफोन्सचा वापर करणे टाळावे.

कानातील संसर्ग : हेडफोन्स लावून सतत गाणी ऐकल्यामुळे नुकसान होते. त्याशिवाय एकमेकांची हेडफोन्स वापरल्याने कानाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आपला हेडफ़ोन्स इतर कोणत्या व्यक्तीला दिला असेल, तर तो सॅनिटायझरने साफ करून घ्यावे.

कान सुन्न होणे : दीर्घ कालावधीसाठी कानात इयरफोन लावून गाणी ऐकल्याने कान बधिर होऊ शकतात. त्याचबरोबर श्रवणक्षमताही होऊ कमी होऊ शकते. या सर्व संकेताकडे दुर्लक्ष केल्यास श्रवणशक्ती कायमची हिरावली जाऊ शकते.

आजकाल उच्च गुणवत्ता असलेले हेडफोन्स आहेत ज्यांचा वापर करताना ते अगदी कानाच्या आत जातात. त्यामुळे गाणी ऐकण्यात अदभूत अनुभव मिळतो. त्यामुळेच हेडफोनचा वापर खूप जास्त काळ केला, तर कानात हवाच जात नाही. त्यामुळे कानात संसर्ग होण्यापासून श्रवणशक्ती कायमची गमावण्याची वेळ येऊ असते.

इयरफोन्सचा वापर करताना सावधगिरी बाळगा : 

मोबाईलचा हेडफोन काढताना ओढून काढू नका. पिनेच्या वर धरून व्यवस्थित पकडून काढा.

चपट्या आकाराची वायर असणारे हेडफोन्स निवडा. ते गुंतत नाहीत.
गरज नसल्यास हेडफोन्स￰ मोबाईल किंवा लॅपटॉपला लावुन ठेवु नये अन्यथा ते ओढले जाऊन तुटू शकतात .
हेडफोन वापरत नसल्यास तसेच टाकू नये ते गुंडाळून एका क्लिपमध्ये अडकवून ठेवावेत.
बॅग पर्समदे इअरफोन न गुंडाळता ठेवू नये. त्यामुळे वायर अडकून ती ढिली किंवा एकमेकांत गुंतते.
हेडफ़ोन्स पाण्यापासून दूर ठेवावेत. झोपण्यापूर्वी कानातून हेडफ़ोन्स काढून ठेवावेत.

If you are using a lot of earphones, be careful on time
थोडे नवीन जरा जुने