दररोज मॉर्निंग वॉक केल्यास तुमच्या शरीरात झालेले हे बदल तुम्हाला जाणवतीलदररोज सकाळी काही वेळ मॉर्निंग वॉकला दिल्यास शरीराला विविध फायदे होतात. मॉर्निंग वॉकमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो तसेच शरीर दिवसभर स्वस्थ आणि उर्जावन राहते.

एका संशोधनानुसार दररोज 30 मिनिट वॉक केल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता एकदम कमी होते. पायी चालण्यासोबतच योग्य आहाराची काळजी घेतल्यास हृदयाशी संबधित आजारांचा धोका जवळपास नष्ट होतो.

कॅन्सर राहतो दूर -
ज्या लोकांची दिनचर्या आणि आहार नियमित असतो त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी राहते. मॉर्निंग वॉक एक असा व्यायाम आहे, ज्यामुळे विविध उपचार नसलेले आजार ठीक होतात.

स्मरणशक्ती वाढते -
दररोज मॉर्निंग वॉक केल्याने संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण जलद गतीने होते. रक्ताभिसरण जलद गतीने झाल्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा स्तर वाढून ऑक्सिजन सरळ मेंदूपर्यंत पोहचतो. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील एका शोधानुसार दररोज सकाळी मॉर्निंग वॉक केल्याने एल्जायमर होण्याची शक्यता कमी होते.

मांसपेशी स्वस्थ राहतात -
दररोज मॉर्निंग वॉक केल्याने मसल्सची स्ट्रेन्थ वाढते.


हेल्दी स्किनसाठी -
दररोज मॉर्निंग वॉक केल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण योग्य होते. पोटाशी संबंधित आजार दूर होतात, त्याचबरोबर त्वचा उजळते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते -

अनेक लोकांना विश्वासच बसतच नाही की, मॉर्निंग वॉक केल्याने शरीरावर एवढा प्रभाव पडतो, कारण मॉर्निंग वॉक केल्याने व्यायाम केल्याप्रमाणे घाम गाळावा लागत नाही. ब्लडप्रेशर रुग्णांसाठी हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. नियमितपणे मॉर्निंग वॉक केल्यास कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.


लठ्ठपणा कमी होतो -
जर तुमचे वजन गरजेपेक्षा जास्त असेल तर मॉर्निंग वॉक तुमच्यासाठी वरदान आहे. सकाळच्या वेळी शरीरात ग्लुकोजचा स्तर झुप कमी असतो. ग्लुकोजचा स्तर कमी असल्यामुळे या वेळेत मॉर्निंग वॉक केल्यास फॅट लवकर बर्न होतात.
थोडे नवीन जरा जुने