जेवताना काही छोट्याछोट्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर हे होतील दुष्परिणाम
जेवण चविष्ट असेल तर खाणारे त्या चवीमध्ये हरपून जातात. खाण्याचेही काहीं नियम असतात हे पण त्यांच्या लक्षात राहत नाही. जेवताना काही छोट्याछोट्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर त्याचा वाईट प्रभाव शरीरावर पडू शकतो. यामुळे योग्य प्रमाणात समतोल आहार घेणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर जेवणात पदार्थांचे योग्य कॉम्बिनेशन आवश्यक आहे. म्हणजे कोणकोणते पदार्थ एकत्र खावेत आणि कोणते खाऊ नयेत. आयुर्वेदामध्ये अशा पदार्थांचे वर्णन मिळते. याच पदार्थांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

दुधासोबत दही - दुधासोबत दही खाणे शरीरासाठी हानिकारक आहे. दुध आणि दही दोघांचे गुणधर्म वेगळे आहेत. हे पदार्थ एकत्र खाल्यास पोटाचे आजार होण्याची शक्यता असते.

चिकनसोबत मिठाई - चिकनसोबत मिठाई खाण्याची आवड असणार्या लोकांनी यापासून दूर राहावे कारण यामुळे पोट खराब होण्याची शक्यता वाढते.


कोल्ड्रिंकननतर पानमसाला - कोल्ड्रिंक पिल्यानंतर किंवा पिण्याच्या अगोदर पेपरमेंट युक्त पानमसाला किंवा इतर कोणत्या पदार्थाचे सेवन करू नये. कोल्ड्रिंक आणि पेपरमेंट एकत्र केल्यास सायनाइड बनते जे विषासमान कार्य करते.

बटाटा आणि तांदूळ - अनेक लोकांना बटाटा आणि भात खाण्याची आवड असते, परंतु ही आवड असणार्या लोकांनी हे दोन्ही पदार्थ एकत्र खाऊ नयेत. यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो.


कांदा आणि दुध - कांदा आणि दुध कधीही एकत्र खाऊ नये. कांद्यासोबत दुध खाल्ल्यास विविध प्रकारचे त्वचा रोग, खाज, एग्जिमा, सोरायसिस होण्याची शक्यता असते.

दुधासोबत लिंबू - दुधासोबत लिंबू किंवा इतर आंबट पदार्थ खाल्ल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते. दोन्ही पदार्थ एकत्र खाल्यास एसिडिटी होते.


उडदाची डाळ आणि दही - उडदाच्या डाळीसोबत दही खाल्ल्याने हृदयाशी संबधित आजार होण्याची शक्यता असते.थोडे नवीन जरा जुने