'या' योग्य वेळी 2 केळी खाल्यास शरीरात होतील 'हे' आरोग्यदायी बदल !बाराही मिळणारं केळं हे फळ न खाणारी व्यक्ती तशी विरळच! उपवासाला बरीच मंडळी केळं किंवा केळ्याचे वेफर्स, कच्च्या केळ्याची भाजीसुद्धा खातात. केळीचं मुळ स्थान दक्षिणपूर्व आशियात आहे, असं म्हटलं जातं.

केळं ही वनस्पती मुसा या कुळातील असून त्याचं शास्त्रीय नाव मुसा पेंराडिसीएका असं आहे. केळी शक्तिवर्धक आहेत. केळीच्या तीस ते चाळीस जाती आहेत. त्यापैकी पिकवून खाण्यास उपयुक्त म्हणजे बसराई, हरी साल, लाल वेलची, मुठडी, वाल्हा, लाल केळी. काहींना केळी खायला अजिबात आवडत नाही, पण केळ्यांचे वेफर्स आणि त्यापासून तयार केलेले तळलेले पदार्थ त्यांना खायला खूप आवडतात.

राजेळी, वनकेळं, रानकेळं अशा काही केळ्यांच्या या जाती तळलेले पदार्थ करण्यासाठी उत्तम असतात. अशा या केळ्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे अनेक आहेत. त्यात पोटॅशिअम, मँगनिज, लोह, तांबं अशी कबरेदकं असतात. तसंच ‘क’, ‘ब’, ‘अ’, ‘इ’ ही जीवनसत्त्वही असतात.रोज दोन केळी खाल्ल्याने व्हिटॅमिन्सची गरज पूर्ण होते.

जेवणानंतर केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.

एक ग्लास दुधात, एक चमचा तूप आणि चिमूटभर वेलची पावडर यांचं मिश्रण केळीबरोबर खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.

केळ्यांमुळे हिमोग्लोबीनमध्ये वाढ होते.

उष्णता जास्त वाटत असेल तर केळं खावं, अंगाची आग कमी होते.

वारंवार पित्त चाळवत असेल तर केळं खावं.

लहान मुलांना केळं द्यावं, कारण ते पौष्टिक, उत्साहवर्धक असतं.

गरदोर महिलांनी केळं खाणं उत्तम असतं कारण त्यात व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त असतं.

If you eat 2 bananas at the right time, healthy changes will occur in the body
थोडे नवीन जरा जुने