सारखा थकवा जाणवत असेल तर मग हे नक्की वाचा !

दिवसातून 2 वेळा कडाडून भूक लागणे, सकाळी एकदाच पोट साफ होणे. रात्रीची झोप व्यवस्थित लागणे, दिवसभर काम करण्याचा उत्साह असणे हे एका स्वस्थ व्यक्तीचे लक्षण आहे. 


यात बिघाड झाला की आजार होतात. पुष्कळ वेळा अनेक कारणांनी थकवा येतो, तर चुकीच्या जीवनशैलीमुळे थकवा वाढत जाऊन आजार होतात. भूक न लागणे, अंग मोडून येणे, डोके दुखणे, डोळ्यासमोर ग्लानी येणे, चक्कर येणे. रात्री झोपेत पोट-या दुखणे, बसून राहावेसे वाटणे, कुणाशी बोलू नये असे वाटणे, डोळे मिटून पडून राहणे, चालताना दम लागणे इ. शरीरास थकवा असताना लक्षणे दिसतात. कारणानुसार व आजारानुसार येणा-या थकव्यास आयुर्वेदात पुढीलप्रमाणे उपचार आहेत. 

उपचार
1) तापातून शरीरात थकवा असेल तर त्यावर दूध उत्तम आहे. तसेच सुंठ, खारीक, मनुका, साखर तूप घालून तापवून थंड करून मध घालून दूध घेतले असता तापामुळे आलेला थकवा निघून जातो. हे उपचार ताप उतरल्यावरच करावे. ताप असताना दूध पिऊ नये.

2) रात्री जागरण, प्रवास, अधिक श्रम इत्यादीने आलेल्या थकव्यासाठी झोप घेणे, आराम करणे व फळांचा रस घेणे असा उपचार करावा.

3) उपवासामुळे झालेला थकवा दूध, फळांचा रस, चहा, नारळ पाणी इत्यादीने दूर होतो.

4) हिमोग्लोबिनच्या कमतरतेने येण-या थकव्यासाठी पौष्टिक आहारात खजूर, अंजीर, गाजर, बीट, पालक, मनुके इ. खावे.

5) रक्तचाप कमी झाल्याने येणा-या थकव्यासाठी डाळिंबाचा रस, खडीसाखर घालून दिवसातून तीन वेळेस घ्यावा, मधुमेही व्यक्तींमध्ये शर्करा कमी झाल्याने थकवा येतो त्यावर योग्य निदान करून गोड पदार्थ खाणे आवश्यक ठरते.

7) अतिसारामुळे येणा-या थकव्यासाठी लिंबू सरबतात 2 चिमूट शंखभस्म टाकून घ्यावे.

8) अनिद्रेमुळे येणा-या थकव्यासाठी म्हशीचे दूध, खडीसाखर, बासुंदी इ. पौष्टिक पदार्थ खावेत.

9) योग्य संतुलित आहार, रात्रीची झोप, प्राणायाम, शिरोधारा, पंचकर्म, सकारात्मक दृष्टिकोन, छंद जोपासणे यातून शरीरस्वास्थ्य टिकून राहून आजार होत नाहीत व थकवाही राहत नाही.

If you feel like fatigue, then read this
थोडे नवीन जरा जुने