डाळिंबाचे 'हे' फायदे वाचाल तर रोज खाल...


डाळिंबाचा रस आणि सरबत उष्णता किंवा तहान शांत करण्याच काम करतो.लूचा त्रास झाल्यानंतर डाळिंबाचा रस आणि सरबत पिणे अत्यंत लाभदायक ठरतं.

डाळिंबाच्या रसाच्या सेवनाने हृदयरोग, आतड्यांचे आजार आणि क्षयरोगात फायदा होतो. डाळिंबाच्या रसाच्या सेवनाने शरीराला ताजेपणा मिळतो. असे नव्हे तर शक्ती सुद्धा प्राप्त होते.

डाळिंब मंग ते दाण्याच्या स्वरूपात खा किंवा रस काढून प्या. बुद्धी; वीर्य;शक्तीवर्धक ठरतो.डाळिंब वायू आणि कफाचा नाश करते.डाळिंबाचा रस घोट घोट पिण्याने पोटाशी संबंधित अनेक आजार दूर होतात. आवाज सुधारतो.हृदयाचं दौर्बल्य कमी होत. 

छातीच्या वेदना नाहीशा होतात. गर्भवती स्त्रियांना उलटीचा त्रास होत असेल तर तो नाहीसा होतो. त्यांचा अशक्तपणाही नाहीसा होतो.ज्याचा चांगला परिणाम गर्भातील बाळावर होतो. डाळिंबाच्या रसाने डोळ्यांची जळजळ आणि लाली शांत होते. नाकातुन रक्त वाहण थांबत.

डाळिंबाचा रस शरीराला ओज, वीर्य, बुद्धी आणि शक्ती प्रदान करतं,डाळिंबाचा रस नव्हे तर फुल, फळांच्या झाडाची सालही अनेक आजार नाहीसे करण्यासाठी साहाय्यक ठरते. 

डाळिंबाचे सुकलेले दाणे, आहारातही समाविष्ट करू शकता तसेच ते औषध निर्मितीसाठी वापरले जातात.डाळिंबाच्या दाण्यांच चूर्ण अपचन, गॅसेस, भूक न लागणे अशा समस्यांमध्ये रामबाण औषध ठरत.

If you read 'this' benefit of pomegranate, eat it daily
थोडे नवीन जरा जुने