चांगले आरोग्य हवे असेल तर रोज थोडे तरी धावलेच पाहिजे !

रोज थोडेफार धावल्याने मेंदूतील तसेच डोळ्यांची कनेक्टिव्हिटीदेखील वाढल्याचे संशोधनात तक्षात आले आहे इतकेच नव्हे, रोज काही अंतर धावले तर अल्झायमरच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरेल , असा दावा या संधोधकांनी केला आहे. 


सध्याचा हिवाळ्याचा काळ ह व्यायामासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात केलेला व्यायाम शरीरासाठी चांगला असतो. आपले शरीर आपल्याला मोफत मिळालेले असते आणि कोणत्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची माणसाला किंमत नसते. त्यामुळे शरीराकडे स्वाभाविकपणे दुर्लक्ष होते ; मात्र त्याचे तोटे वय वाढल्यानंतर होतात . त्यामुळे प्रत्येकाने तरुणपणीच सावध होऊन व्यायामाची कास धरायला पाहिजे , धावल्यामुळे पायाचे स्नायू बळकट होतात , रक्ताभिसरण चांगले होते , पचनशक्ती सुधारते हे महिती आहेच.

मात्र , एका नव्या संशोधननुसार धावण्याने मेंदूतील कनेक्टिव्हिटीला आणखी चांगल्याप्रकारे गती मिळते . त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते . युरोपातील संशोधक डेव्हिड रेचलेन यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे . त्यांना यासाठी प्रौढ लोकांचे ब्रेन मॅपिंग तसेच एआयआय स्कॅन करून त्यांनी या संशोधनाला सिद्ध केले आहे . जे लोक थोड़े फार धावले आहेत , त्यांच्या मेंदूतील कनेन्टिव्हिटी अधिक वाढल्याचे या संशोधनात लक्षात आले आहे.

या लोकांच्या डोळ्यांची कनेक्टिव्हिटीदेखील धावल्याने वाढल्याचे लक्षात आले आहे . इतकेच नव्हे , रोज काही अंतर धावले तर अल्झायमरच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरेल , असा दावा या संधोधकांनी केला आहे . मेंदू तल्लख ठेवायचा असेल , शेवटपर्यंत स्मरणशक्त कायम ठेवयची असेल , तर रोज व्यायामासाठी वेळ काढण्यास विसरता काम नये , या व्यायामात थोडा वेळ धावण्याचादेखील नकी समावेश करा ; कारण त्याचे फायदे अगणिक आहेत.

If you want good health, you should run a little daily
थोडे नवीन जरा जुने