'ह्या' गोष्टी अनुभवायच्या असतील तर हनिमूनला गेलेच पाहिजे !


हनीमून म्हणजेच मधुचंद्राला जाण्याचा ट्रेंड अलिकडे चांगलाच फोफावतो आहे. पूर्वी भारतात अशाप्रकारचं हनीमूनला जाण्याची क्रेझ फार नव्हती. पूर्वी लोकं हनीमूनला देशातीलच हिल्स स्टेशनवर जायची पण नंतर आता लोकं भरमसाठ पैसा खर्च करून परदेशातही जायला लागली. 

आता तर वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांनी वेगवेगळी हनीमून पॅकेजेस तयार केलीयेत. लग्नाचे सर्व संस्कार, रितीरिवाज पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी कोणतही जोडपं हेच करतं. पण कधी तुम्ही याचा विचार केलाय का की, हनीमूनला जाणे इतके महत्वाचे का आहे?

जेव्हा एखाद्या जोडप्याचं लग्न होतं तेव्हा त्यांना समाज आणि घरच्यांना बघून सर्व रितीरिवाज पूर्ण करावे लागतात. पण त्यानंतरचा रितीरिवाज म्हणजे हनीमून हा फक्त त्या दोघांचा असतो. हनीमूनवर जाणं म्हणजे फक्त रिलॅक्स होणे नाहीतर हिच ती वेळ असते जेव्हा ते दोघे ऎकमेकांना जास्त समजून घेत असतात. हनीमूनवर जाणे यासाठीही आवश्यक आहे कारण याच वेळात ते ऎकमेकांवर विश्वास ठेवायला सुरूवात करत असतात. यासोबत अशा अनेक गोष्टी आहे ज्यामुळे हनीमूनला जाणे महत्वाचे मानले जाते.

१) लग्नाचा समारंभ हा धमाल आणि मस्तीने भरलेला असतो. हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला हा विश्वास देत असता की, जीवनभर तुम्ही ऎकमेकांची साथ सोडणार नाही. हा आनंदाचा क्षण आणि जीवनाच्या नव्या सुरवातीचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी हनीमून खूप महत्वाचा मानला जातो.

२) तुमच्या बिझी शेड्युमधून काही वेळ काढून तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवणे खूप चांगली आयडिया आहे. यामुळे दोन व्यक्तींमध्ये शारीरिक आणि मानसिक जवळीक आणखी घनिष्ट होते. दोघांनाही ऎकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळतो.

३) जेव्हा तुम्ही घर-परीवारापासून आणि दोस्तांपासून दूर फक्त एकाच व्यक्तीसोबत असता तेव्हा तुमचे पुर्ण लक्षा त्या व्यक्तीवर असतं. त्यामुळे तुम्हा दोघांनाही तुमच्या आवडीनिवडी, विचार जाणून घेता येतात.

४) लग्नानंतर नव्या जीवनाच्या सुरवातीलाच असे बाहेर कुठे गेलात तर त्या आठवणी जीवनभर तुमच्या स्मरणात राहतील.

५) लग्न समारंभात चांगली धावपळ झाल्याने तुम्हाला थकवा आलेला असतो अशात दोघांनाही शांत वेळ मिळतो. हनीमूनमुळे तुम्ही एकदम फ्रेश होऊ शकता.
If you want to experience these things, then you must go to Honeymoon
थोडे नवीन जरा जुने