सोशल मीडियाचे व्यसन सोडवायचे असेल तर 'ह्या' टिप्स करा फॉलो !


फेसबुक व्हॉट्सअ‍ॅपची नशा ही आता सिगारेट - मद्यपानापेक्षा कमी धोकादायक राहिलेली नाही . एकदा सोशल मीडियाच्या या प्रकारांचे व्यसन लागले की , माणसाची रात्रीची झोष हराम झालीच म्हणून समजा ! किशोर व युवा वर्गाच्या मुला - मुलींना तर चॅटिंग करण्यापुढे तहान - भुकेचीही आठवण राहत नाही आणि त्यापुढे त्यांना कोणत्याही कामाचे महत्त्वही वाटत नाही की कामामध्ये रसही वाटत नाही .

इतरांना हिंडता फिरतना , पार्टी साजरी करीत असताना या महागडे कपडे खरेदी करतांना पाहून काही जणांना , जीवनामध्ये असंतुष्ट वाटू लागते . ब्रिटिश लेखिका करीन अमेंदोड यांनी याच विषयावर लिहिलेल्या व्हाय सोशल मीडिया इज रुलिंग युअर लाईफ' या पुस्तकामध्ये तरूणांना सोशल मीडियाचे हे लागलेले व्यसन सोडविण्यासाठी नवनवीन उपाय सुचविले आहेत .


तुलना करणे टाळा - फेसबुकच्या वेशात सुरू असणा -या हालचालींना आपल्या भावनांना ' वरचढ होऊ देऊ नका. कधीच आपल्या आनंदाची आणि दुसऱ्याच्या आनंदाची तुलना करू नका , हे विसरु नका, काळ जसा पुढे जात जाईल तसतसा हिंडण्या फिरण्याच्या व आपल्या जनांबरोबर पार्टी साजरी करण्याची संधी ही सर्वांच्याच जीवनात येत असते .

फ़ोन फ्री झोन निर्धारित करा
वेलकम व लिव्हिंग रूम मधील सोशल मीडियाच्या जगातून बाहेर पडून परिसरातील इतर सदस्यांशी मिळून मिसळून थेट संपर्क साधून घराच्या आनंदात भर घालवण्याचा प्रयत्न करा . म्हणूनच यासाठी कॅथरिन तरुण पिढीला फन फ्री झोन बनविण्याचा सल्ला देत आहेत . त्या डायनिंग रुममध्ये फोनच्या वापरावर स्वत मनाई घोपित करण्यावर भर देतात . यामुळे घरातील लोकांबरोबर भोजन करण्याचा आनंद तुम्हाला पुरेपूर लुटता येईल . त्यांचे असेही म्हणणे आहे की , फोनच्या वापरासाठी विशिष्ट समय निर्धारित केला पाहिजे . दिवसभरातील दोन तास हे जीवनसाथी आणि मुलांसह व्यतीत केले पाहिजेत , फोन बंद ठेवून !

कल्पना साम्राज्यात रमू नका - 
प्रेम व्यक करण्याची व समोरच्याचे महत्त्व अधोरेखित करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते . म्हणूनच फेसबुक वा व्हाट्सअपवर दुसया खाद्य महिलेने आपल्या पतीकडून मागणी केली , तर तुम्ही लगेच स्वतःच्या पार्टनरकडून तशी अपेक्ष करू नका . ऑफ़लाइन राहण्याचा प्रयत्न करा - कॅटरिन याच्या म्हाण्याप्रमाणे नाती ही आनंदाचे क्षण प्रदान करणारी गुरुकिल्ली आहे म्हणूनच तुमचे जीनसाथीवर असणारे प्रेम हे केवळ ऑनलाईन विश्रापुरतेच सीमित नसावे , पंळोवेळी प्रत्यक्ष भेटणे व फोनवर केवळ बोलूनही तुम्ही आपले प्रेमाचे नाते जात बळकट करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत , म्हणूनच फेसबुक - व्हॉट्सअपद्वारे मित्रांशी संपर्क साधण्याचा वेळ नियंत्रित ठेवा. आठवड्यातून एकदा तरी प्रत्यक्ष भेटा. फोन संवादावर भर द्या.

जर समोरचा असे करण्यास राजी नसेल , तर त्याला दूर ठेवण्यातच तुमचे हित आहे , हे पक्के लक्षात ठेवा .

If you want to get rid of social media addiction, follow these tips
थोडे नवीन जरा जुने