लवकर केस वाढवायचे असतील तर करा हे उपाय !


एका वाटीमध्ये 1 चमचा नारळ तेल, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल, 1 चमचा मध आणि एक अंड हे सर्व एकत्र करून चांगलं मिश्रण बनवून घ्या. हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळापासून लावा आणि साधारण एक तासापर्यंत ठेवून द्या. त्यानंतर केस थंड पाण्याने धुवून घ्या. हे मिश्रण लावल्यानंतर कधीही गरम पाण्याने धुऊ नये हे कायम लक्षात ठेवा. गरम पाण्याने धुतल्यास, तुमच्या केसांना अपाय होऊ शकतो. या उपायामुळे तुमचे केस लांबसडक आणि चमकदार होतील. केसांवर याचा चांगला परिणाम होण्यासाठी तुम्ही साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग तुमच्या केसांवर करू शकता. एका महिन्यामध्ये तुमचे केस लांबसडक होण्यास सुरुवात होईल आणि केसांवर सकारात्मक परिणाम दिसेल.

एक अंडे, दोन ते अडीच चमचे ऑलिव्ह ऑईल, एक व्हिटामिन ई कॅप्सूल, एक चमचा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आणि २ थेंब इसेन्शियल ऑईल हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवून घ्या. इसेन्शियल ऑईल हे अंड आणि अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा वास कमी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. ही पेस्ट तुम्ही केसांच्या मुळांपासून लावा आणि एक तासानंतर शॅम्पूने केस धुवा. केस धुतल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही कंडिशनरचादेखील वापर करू शकता. 15 दिवसातून एक वेळा तुम्ही केसांवर ही पेस्ट लावू शकता.मध्यम आकाराचा अव्हॅकॅडो आणि एक छोटं केळं मॅश करून घ्या. आता त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि व्हिट जर्म ऑईल मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांना लावून केसांना हलक्या हाताने मसाज करा आणि साधारणतः अर्धा तास केस तसेच ठेवा. त्यानंतर केस शॅम्पू लावून थंड पाण्याने धुवा. असं आठवड्यातून तुम्ही दोन वेळा केल्यास, तुमचे केस झटपट वाढण्यास मदत होते.

एका भांड्यात एक चमचा आवळ्याचा रस, 1 चमचा शिकाकाई पावडर, 2 चमचे नारळाचे तेल हे सर्व एकत्र घालून उकळून घ्या. थोडं थंड झाल्यानंतर आपल्या केसांवर लावून मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वी हे करा आणि सकाळी तुमचे केस शँपूने धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शकता.

If you want to grow instant hair, try this solution
थोडे नवीन जरा जुने