नैराश्याचा धोका कमी करायचा असेल तर सकाळी लवकर उठा !


ज्या लोकांना सकाळी लवकर उठण्याची सवय असते, त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहू शकते आणि त्यांना नैराश्य व सिजोफ्रेनियासारखे मनोविकार जडण्याची जोखीम कमी असते, असे एका अध्ययनातून समोर आले आहे.


या अध्ययनात बॉडी क्लॉक म्हणजे जैविक घड्याळासंबंधी काही महत्त्वाचा खुलासा करण्यात आला असून मानसिक आरोग्य व आजार यांच्याशी त्याचा कसा संबंध असतो, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 


अर्थात या अध्ययनाच्या निष्कर्षाचा आधीच्या अंदाजाप्रमाणे मधुमेह वा लठ्ठपणासारख्या आजारांसोबत एखादा मजबूत संबंध असल्याचा खुलासा झालेला नाही. ब्रिटनमधील एक्सटर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यांनी सांगितले की, सकाळी लवकर उठल्याने फुफ्फुसांना स्वच्छ व शुद्ध ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे श्वासाच्या समस्या दूर होऊन फुफ्फुस निरोगी राहतात. 


व्यायाम केल्याने शरीरात रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे ह्रदय ठणठणीत राहते. अनेक मानसिक आजारही दूर होतात. सकाळी उठून योग व प्राणायाम करण्याचेही अनेक लाभ आहेत. त्यामुळे दिवसभर ताजेतवाणे वाटते व कामावर मन लागते. साहजिकच सगळी कामे वेळेवर होता.

If you want to reduce the risk of depression, get up early in the morning
थोडे नवीन जरा जुने