आजारांचा धोका कमी करायचा असेल तर 'हा' आहे उत्तम मार्ग....

लंडन : नियमित व्यायाम तुमच्या शरीराला केवळ वरूनच नाही तर आतूनदेखील मजबूत बनवतो. एका ताज्या अध्ययनानुसार, व्यायामामुळे शरीराच्या आतील अवयवांना प्रभावित करणारी चरबी कमी होते. साहजिकच त्यांची कार्यक्षमता सुधारते. यामुळे ह्रदयाचे आजार व मधुमेहासारख्या आजारांचा धोका कमी होतो. 


शास्त्रज्ञांनी सांगितले की, जी चरबी शरीराच्या बाहेर दिसत नाही, ती जास्त खतरनाक असते. तुमच्या आतड्यांमध्ये जमा होणारा चरबी यामुळे जास्त घातक ठरते. ती खतरनाक पद्धतीने ह्रदय, यकृत आणि अन्य अवयवांना प्रभावित करण्यास सक्षम असते. 

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साउथवेस्टर्नचे सहाय्यक प्राध्यापक इयान नीलँड यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे अद्ययन केले असून त्यांनी सांगितले की, ही चरबी संपूर्ण शरीराच्या व्यवस्थेवर प्रभाव पाडते. 

ती घटविण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. या अध्ययनात सहभागी लोकांवर औषध व व्यायाम दोन्हींचा प्रभाव पाहण्यात आला. आतड्यांमध्ये जमा होणारी चरबी कमी नष्ट करण्यात व्यायाम औषधापेक्षाही जास्त प्रभावी असल्याचे आढळून आले. 

If you want to reduce the risk of illness, then 'yes' is the best way ..
थोडे नवीन जरा जुने