ऑफिसमध्ये काम करताय मग हे तुमच्यासाठी...
ब-याच जणांना ऑफिसमध्ये काम करताना अधून-मधून खाण्याची सवय असते. बरेच जण अधे-मधे खाण्यासाठी जंक फुड्स निवडत असतात.


या जंक फुड खाण्याने आपल्या शरिरातील फॅट वाढण्याची शक्यता असल्याने बरेच ज़ण खाणार तर काय खाणार ज्यामुळे शरिरातील फॅट वाढणार नाही आणि अधुम-मधुन पेटपुजा पण होईल या द्विधा मनस्थितीत असतात.

तुमची हिच द्विधामनस्थिती ओळखुन आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये असताना काय खावे याबद्दलच्या काही टिप्स सांगणार आहोत. ज्या तुमच्यासाठी हेल्दी पण आहेत आणि फॅट वाढवणा-या पण नाहीये.

1. ड्राय फ्रुट्स -

न्युट्रिशनसाठी ड्राय फ्रुट्स हे उत्तम पर्याय आहे. तुम्ही हे सकाळी जाताना पर्समध्ये घेवून जाऊ शकतात. तसेच कामात असताना भुक लागल्यास खाऊ पण शकतात. फळे खाल्ल्याने तुम्ही तंदुरूस्त राहण्यास मद्त होईल.

2. स्प्राउट्स (कडधान्ये ) -
ऑफिसमध्ये जर तुम्हाला सारखी भुक लागत असेल तर कडधान्ये खाणे केव्हाही उत्तम. कडधान्यात प्रोटिन, व्हिटॅमिन, ऍन्टी ऑक्सिडट्स आणि अमिनो ऍसिड असते. कडधान्ये खाल्ल्याने शरिरात ताकद येण्यास मद्त होते. कडधान्यांमुळे फास्टफुड खाण्याची इच्छा कमी होते.

चटपटे स्प्राउट्स बनवण्याचा विधी -
चटपटे स्प्राउट्स बनवण्यासाठी चने, हिरवे मुग आणि सोया एकत्र रात्री भिजत टाका. दुस-या दिवशी जेव्हा मोड येईल त्यावेळी त्यावर कांदा, टोमॅटो आणि जिरे बारीक करून टाकल्यास चविष्ट होतात.

ऑफिसमध्ये तुम्ही कोणते-कोणते पदार्थ खाऊ शकता हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....

3. होम मेड पॉपकॉर्न -
ब-याच जणांना पॉपकॉर्न आवडतात. पण जाडी वाढेल यासाठी बरेच जणं हे खाणे टाळतात. आम्ही तुम्हाला पॉपकॉर्न खाण्याचा सल्ला देत आहोत. पॉपकॉर्न हे हेल्दी डायेट आहे. जर तुम्ही पॉपकॉर्नला बटर अथवा तेल न लावता खाल्ले तर ते तुमच्या शरिरासाठी हानिकारक नाही.

4. भेळ -
भेळ सुद्धा हेल्दी सॅक्स आहे. भेळ टेस्टी होण्यासाठी यामध्ये टोमॅटो,कांदा, हिरवी मिर्ची, आणि धने पावडर टाकावी. यावर तुम्ही हिरवी चटणी आणि दाणे टाकून त्याची चव आणखीन वाढवू शकता.
थोडे नवीन जरा जुने