तुमच्याही आहारात ब्रेडचा समावेश असाल तर,हे नक्की वाचा !


मुंबई : आजकाल खाण्याच्या बाबतीतला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा शॉर्टकट म्हणजे ब्रेड. अनेकजणांचे खाणे हे ब्रेडशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मात्र, तुम्हालाही अतिप्रमाणात ब्रेडचे पदार्थ खाण्याची सवय असेल तर, वेळीच सावध व्हा. ब्रेड, पिझ्झा आदी पदार्थ हे कॅन्सरजन्स असल्याचा दावा सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेन्ट या संस्थेने केला आहे. या संस्थेने केलेल्या सर्व्हेत ही माहिती पूढे आली आहे.

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेन्ट संस्थेने केलेल्या दाव्यानुसार ब्रेड, पिझ्झा, पाव, बन पाव, बर्गर ब्रेड अशा सर्व घटकांमध्ये कॅन्सरजन्य केमीकल असतात. याची सत्यता पडताळण्यासाठी या संस्थेने दिल्लीतील अनेक बेकरी आणि फास्टपूड आऊटलेटमधील नमुन्यांच्या चाचण्या केल्या. या चाचण्यातून पूढे अलेली धक्कादायक माहिती अशी की, केलेल्या चाचण्यांपैकी ७५ टक्के टेस्ट या पॉझिटिव्ह आल्या.

केमिकलमुळे होणारे परिणाम

– या दोन्ही केमिकल्सच्या सेवनाने मूत्रपिंडाचे विकार होऊ शकतात.

– थायरॉईडसारख्या आजाराला आपण निमंत्रण देऊ शकतो.

– इतकंच नाही, तर केमिकलच्या अति सेवनाने कॅन्सरही होऊ शकतो.

अनेक देशांत बंदी भारतात मात्र मुक्त वापर

ब्रोमेट या केमिकलचा वापर अन्नपदार्थात करणे हे अत्यंत धोकादायक असल्याचे एका आंतरराष्ट्रीय संस्थेने १९८९ मध्ये सांगितले होते. त्यानंतर १९९० पासून कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, श्रीलंका, ब्राझील, नायजेरिया, पेरु, कोलंबिया अशा देशांमध्ये ही दोन्ही केमिकलवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आपल्या देशात कायद्याच्या चोरवाटांचा आधार घेत या केमिकलचा वापर सर्रास सुरूच आहे.
If your diet also includes bread, read this
थोडे नवीन जरा जुने