कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे शरीरामध्ये होतील 'हे' बदल, चुकूनही करू नका 'या' बदलांकडे 'दुर्लक्ष'


कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा शरीरामध्ये अनेक बदल व्हायला लागतात. हे बदल पाहून तुम्हीदेखील शरीरामध्ये होणाऱ्या असामान्यतेचा शोध लावू शकता. या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये.
मान आणि डोकेदुखी
जर रक्तामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी खूप जास्त वाढली असेल तर ब्लड व्हेसल्स ब्लॉक व्हायला लागतात. यामुळे मेंदूतील रक्त प्रवाह प्रभावित होतो. मान आणि खांद्यांमध्ये सूज आणि वेदना जाणवू शकतात.

पिवळ्या रंगात वाढ
तुमच्या डोळ्यांच्या वर किंवा खालच्या पापण्यांवर पिवळ्या रंगात वाढ होत असेल तर हा रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्याचा संकेत आहे. कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित करत यापासून सुटका मिळू शकते.

असामान्य हृदय गती
अनेकदा व्यायाम केल्यानंतर वेगाने धावणे किंवा पायऱ्या चढल्यानंतर हृदय वेगाने धडकते. जर थकवा जाणवत असेल आणि हृदयाचे ठोके वेगाने होत असतील तर हे कोलेस्टरॉल वाढण्याचे कारण आहे.

हात-पाय थरथरणे
रक्तामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा शरीरातील ब्लड व्हेसल्स बंद व्हायला लागतात. हात आणि पाय थरथरत असल्यासारखे वाटते किंवा हात-पायांमध्ये वेदनाही याचे एक कारण आहे.

वजन वाढणे
अचानक कोणतेही कारण नसताना वजन सातत्याने वाढत असेल आणि तुम्हाला दर वेळी जड-जड वाडत असेल तर हा हाय कोलेस्टेरॉल लेव्हल वाढण्याचा संकेत असू शकतो. डॉक्टरकडून तपासून घ्या.

कॉर्नियामध्ये रिंग
तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग म्हणजेच कॉर्नियाच्या आसपास तपकिरी रंगाच्या रिंगसारखे काही तरी दिसत असेल तर हे कोलेस्टेरॉल वाढण्याचे कारण असू शकते. साधारणत: ही स्थिती वृद्धांमध्ये जास्त असते.
Increased cholesterol will cause the body to ignore these 'changes, do not miss' changes.
थोडे नवीन जरा जुने