स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अल्कोहलचे सेवन खरच फायदेशीर ठरते का?


लंडन: अल्कोहल घेतल्याने शरिराला होणा-या नुकसानांबद्दल तर तुम्ही बरंच काही ऎकलं असेल. मात्र याचे अनेक फायदेही असतात हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्यही वाटेल. जर तुम्हाला गोष्टी लक्षात राहत नसतील, तुमची मेमरी कमजोर असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी अल्कोहल तुमची मदत करू शकतं. म्हणजेच तुमची स्मरणशक्ती वाढवण्यात अल्कोहल मदत करतं. नुकत्याच समोर आलेल्या एका रिसर्चमधून खुलासा झालाय की, अल्कोहलच्या सेवनामुळे तुम्हाच्या जास्त लक्षात राहतं आणि हे लक्षात ठेवण्यासाठी याची मोठी मदत होते.

ब्रिटनची युनिव्हर्सिटी ऑफ एक्सिटरमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासाचा दावा आहे की, जर ड्रिंकींग सेशनच्या आधी एखादी सूचना किंवा माहितीला जाणून घेतलं तर अल्कोहलमुळे ती सूचना जास्त काळापर्यंत लक्षात राहते. कारण अल्कोहल आपल्या लक्षात ठेवण्याच्या शक्तीला वाढवण्यात मदत करतं. तेच अभ्यासकांनी या गोष्टीवरही जोर दिला आहे की, अल्कोहलचं जास्त सेवन हे आपल्या शरिरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे.


अभ्यासकांच्या रिसर्च दरम्यान, 18 ते 53 वयोगटातील 88 सोशल ड्रिंकर्स ज्यात 31 पुरूष आणि 57 महिलांचा समावेश होता. त्यांना यावेळी टास्क देण्यात आलं होतं. त्यानंतर सहभागी लोकांना दोन गटात विभागण्यात आलं. एका गटाला हवं तेवढं अल्कोहल पिण्याची मुभा देण्यात आली तर दुस-या गटाला अल्कोहल पिण्यास मनाई करण्यात आली. दुस-या सर्वच लोकांनी तोच टाक्स पुन्हा केला. यातून निष्कर्ष निघाला की, ज्यांनी अल्कोहल घेतलं होतं त्यांना गोष्टी जास्त लक्षात होत्या.

यूनिव्हर्सिटी ऑफ एक्सिटरच्या प्रोफेसर स्लिया मॉर्गन यांनी सांगितले की, आमच्या या अभ्यासातून समोर आलं आहे की ज्यांनी अल्कोहल सेवन केलं होतं त्यांनी वर्ड लर्निंगचा टास्क चांगला केला आणि ज्यांनी जास्त अल्कोहल सेवन केलं होतं त्यांनी अधिक चांगला केला. याचं कारण अजून स्पष्ट नाही पण असे मानले जात आहे की, अल्कोहल कोणत्याही नव्या लर्निंगला ब्लॉक करतं. त्यामुळे ब्रेनमध्ये जास्त संसाधन होतं. जे नव्याने लक्षात ठेवलेल्या सूचनेला जास्त काळ लक्षात ठेवण्यात मदत करतं.
Is alcohol consumption really beneficial for increasing memory?
थोडे नवीन जरा जुने