पोटात गॅस होतोय ? खास घरगुती उपाय




पोटात गॅस होणे ही एक सामान्य समस्या आहे. एखाद्याला ही समस्या सुरु झाली तर त्याचा दिवस खराब जातो. ही समस्या निर्माण झाल्यास, व्यक्ती कोणतेही काम व्यवस्थित करू शकत नाही.
या समस्येचे मुख्य कारण अनियमित दिनचर्या हे आहे. तुम्हालाही नेहमी पोटात गॅस होण्याची समस्या असेल तर आम्ही काही खास घरगुती उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यास तुमची गॅस्ट्रिक समस्या दूर होईल.

पोटात गॅस झाल्याचे सामान्य लक्षण -
1. मळमळ

2. उलटी

3. वारंवार उचकी लागणे

4. पोटदुखी आणि सूज



पाणी प्यावे -

पाणी न पिणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता हे यामागचे एक मोठे कारण आहे. गॅसची समस्या असो किंवा नसो दिवसभरातून कमीतकमी आठ ग्लास पाणी प्यावे. गॅसची समस्या असल्यास जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे.

नारळ पाणी -

नारळ पाणी गॅस समस्येमध्ये औषधाचे काम करते. हे व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांनी भरलेले असते. पोटात गॅसची समस्या असल्यास दोन-तीन वेळेस नारळाचे पाणी प्यावे. आराम मिळेल.

अद्रक -
गॅसची समस्या असल्यास अद्रक हे एक रामबाण औषधीप्रमाणे काम करते. अद्रक टाकून केलेला चहा पिल्यास आराम मिळेल. अद्रकामध्ये अँटीबॅक्टिरीअल आणि अँटीइंफ्लामेंट्री तत्व आढळून येतात. यामुळे पोटातील गॅसची समस्या त्वरित दूर होण्यास मदत होते. सुकलेल्या अद्रकाचा काढा करून पिल्यास ही समस्या नष्ट होते.


अननस -
अननसात तंतुमय पदार्थ भरपूर असतो. यामध्ये पाचक एन्जाइम्स उपलब्ध असतात. पोटात गॅसची समस्या असल्यास एल्कलाइन तत्व असलेल्या पदार्थांचे भरपूर सेवन करावे. अननसामध्ये एल्कलाइनचे प्रमाण जास्त असते. यामुळे याचे सेवन केल्यास गॅसची समस्या दूर होते. परंतु नेहमी पिकलेले अननस खावे. अननसाच्या सेवनाने पचनास फायदा होतो.

बटाटा -

गॅसची समस्या दूर करण्यात बटाट्याचा उपाय तुम्हाला थोडासा विचित्र वाटेल परंतु, बटाट्याचा रस पिल्यास गॅसची समस्या दूर होते. बटाटा एल्कलाइनचा उत्तम स्रोत आहे. याचे ज्यूस तयार करण्यासाठी कच्चे बटाटे सोलून त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हे ज्यूस गाळून घ्या आणि त्यामध्ये थोडेसे गरम पाणी टाका. या ज्यूसचे सेवन केल्यास गॅसची समस्या दूर होईल. हे ज्यूस लिव्हरसाठी उपयुक्त आहे.


काळे मिरे -

काळे मिरे पोटातील गॅस समस्या दूर करण्याचा प्रभावी उपाय आहे. अर्धा ग्रॅम काळे मिरे बारीक करून त्यामध्ये मध मिसळून, या मिश्रणाचे सेवन केल्यास आराम मिळेल.

तुळस -
विविध आजारांमध्ये तुळस उपयुक्त औषधीप्रमाणे काम करते. दररोज तुळशीचे पाच पानं खाल्ल्यास पोटातील गॅसची समस्या तसेच इतर पोटाचे आजार ठीक होतील. गॅस समस्येमध्ये तुळशीचा चहा करून पिल्यास आराम मिळेल.
ताक -
थोडेसे मेथी दाणे, हळद, हिंग आणि जिरे बारीक करून चूर्ण तयार करा. सकाळी जेवण केल्यानंतर ताकामध्ये हे चूर्ण टाकून पिल्यास गॅस, एसिडिटीची समस्या दूर होईल.

हळद -
हळदीला सर्वात दमदार अँटीबायोटिक मानले जाते. त्वचा, पोट, आणि शरीरातील विविध आजारांवर हळद रामबाण उपाय आहे. थोडीशी हळद थंड पाण्यातून घ्या, त्यानंतर दही किंवा केळ खा.


थोडे नवीन जरा जुने