वेश्येकडे जाऊन सेक्स करणे खरेच किती योग्य आहे?
वेश्येबरोबर सेक्स करणे खरेच योग्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक मुद्दे समोर येतात. त्या मुद्द्यांमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे आहेत. तर, अनेक उत्तरांतही प्रश्नांची मुळे रूतलेली आपणास पहायला मिळतात. उदा. वेश्येबरोबर सेक्स केरणे हे आरोग्यासाठी धोकादायक असते.
मात्र, अशा प्रकारचा सेक्स करताना जर कंडोमचा वापर केला तर, सेक्स सेफ होऊ शकतो. याही मुद्द्यांवर अनेक लोक आपली मतमतांतरे व्यक्त करतात. पण वेश्येकडे जाऊन सेक्स करणे खरेच किती योग्य आहे?

सेक्स ही निसर्गातील प्रत्येक जीवाच्या मनाची आणि पर्यायाने शरीराची एक नैसर्गिक भावना आहे. त्यामुळे अपवाद वगळता सेक्स न करणारी व्यक्ती किंवा प्राणी मिळणे तसा दुर्मीळच. पण निरसर्गातील इतर प्राणी आणि मानव प्राणी यांच्यात एक महत्वाचा फरक आहे. मानवेत्तर प्राणी सेक्स करण्यासाठी मादीकडून प्रतिसाद मिळण्याची किंवा नैसर्गीकपणे तसा काळ येण्याची वाट पहातात. तसेच, ठरावीक काळ संपला की मानवेत्तर प्राणी नर, मादी असे एकत्र राहू शकतात.

मानवाचे मात्र, याच्या उलट आहे. मानव प्राणी संधी मिळेल तेव्हा आणि मिळेल तेथे सेक्स करू इच्छितो. तसेच, सेक्स करण्यास मिळाला नाही तर, अनेकांचे मानसिक संतूलनही बिघडलेले आपणास पहायला मिळते. त्यामुळे अनेक व्यक्ती या वेश्यागमन करताना दिसतात. सेक्स मिळविण्यासाठी ते पैसे खर्च करून वेश्येकडे जातात व सेक्स करतात. पण वेश्येकडे जाऊन सेक्स करणे खरेच किती योग्य आहे? याबाबत जाणून घ्या काही मतमतांतरे…

वेश्येबरोबर सेक्स करणे यात काहीही गैर किंवा चुकीचे नाही. अनेकांना आपल्या लैंगिक शक्तीचे दमन करण्यासाठी आपला जोडीदार पुरेसा ठरू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडून गैरवर्तनूक घडण्यापेक्षा वेश्येसोबत सेक्स करणे केव्हाही चांगले, असे काही लोकांचे मत असते. तर या उलट काही लोकांचे मत असे की, अशा प्रकारे सेक्स करणे हे पुर्णपणे चुकीचे आहे.

कारण, ही एक वृत्ती आहे आणि याचा प्रसार समाजात जर झाला तर, सामाजीक शांतता तसेच, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच, मानवी देह हा व्यापार करण्यासाठी नाही. त्यामुळे अशा प्रकारे देहविक्री करून पैसा कमावने, तसेच, पैसे देऊन केवळ उपभोगण्यासाठी एखाद्याचे शरीर मिळवणे हे सभ्येतेला धरून नाही.

अशा प्रकारे सेक्स करणे हे पूर्ण पणे चुकीचे आहे. कारण, तुम्ही वैवाहिक जीवन जगत असाल तर, तुमच्या जोडीदाराला तुम्ही धोका देत अहात. जर, तुम्ही विवाहीत नसाल तर, तुमच्या आईवडीलांचे संस्कार, संस्कृती यांना तुम्ही काळीमा फासता अहात, असे अनेकांचे म्हणने आहे. तर, सेक्स ही माणसाची गरज आहे. त्यामुळे ती त्याला मिळायलाच हवी. ती जर मिळत नसेल तर वेश्यागमन करून पैशाने विकत घेतली तर त्यात हरकत घेण्यासारखे काहीच नाही, असे काहींचे म्हणने आहे.

वेश्यागमन करणे हे दुधारी तलवारीसारखे आहे. कारण काही वेळाचा आनंद मिळवीण्यासाठी तुम्हाला आय़ुष्यभर पस्तावा करावा लागेल अशी शिक्षा तुम्हाला मिळू शकते. एड्स, एचआयव्ही, टिबी तसेच विवीध प्रकारचे गुप्तरोग, त्वचाविकार हे वेश्यागमन केल्याने होतात.

त्यामुळे वेश्येसोबत सेक्स करताना तुम्हाला प्रचंड काळजी घ्यावी लागते. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कंडोमचा वापर करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच, स्वच्छता आणि इतर काही गोष्टीही तुम्हाला विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळे वेश्येबरोबर सेक्स करणे हे वेश्यागमन करणे हे दुधारी तलवारीसारखे आहे हेच खले.

थोडे नवीन जरा जुने