आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही मग हे करा...
धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही, पण आहारात काही खास गोष्टी सामील करून देखील तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता. या पदार्थांमधून तुम्हाला पोषक तत्त्वे देखील मिळतील.

करवंदे : (ब्ल्यूबेरी)
यातील घटक : करवंद्यात अँटीऑक्सीडंट. व्हिटॅमिन्स सी आणि फायबर असते.
फायदा : फायबर कोलेस्टेरॉल आणि शुगर नियंत्रणात ठेवतो. अँटीऑक्सीडंट कॅन्सरचा सामना करण्यासाठी मदतीचा ठरतो.
कसे खावे : फ्रूट सलाडमध्ये मिसळून तसेच दह्यात मिक्स करून खाऊ शकत

किती खावे : अर्धी वाटी


ब्लॅक टी
यातील घटक : ब्लॅक टी मध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सीडंट असते.
फायदा : रक्तदाब कमी करण्यात मदत होते.
कसे खावे : गरम पाण्यात चहा पत्ती तीन मिनिटांपर्यंत उकळावी नंतर गाळून प्यावे.

किती प्यावा : दिवसातून दोन ते तीन वेळा.
ब्रोक्कली :
यातील घटक : ब्रोक्कलीत व्हिटॅमिन्स सी आणि के असते. तसेच फॉलिक अँसिड, कॅल्शियम आणि फायबर असते.
फायदा : व्हिटॅमिन के ने रक्त शुद्ध होते. कॅल्शियमने हाडे मजबूत होतात.
कसे खावे : इतर भाज्यांसोबत मिक्स करून शिजवून खावे. काबुली चण्याच्या चटणीसोबत देखील खाता येईल.
किती खावे : भाजीत एक वाटी पुरेसे
अक्रोड
यातील घटक : अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई असते. त्याचप्रमाणे मुबलक प्रमाणात ओमेगा-3 आइल असते.

फायदा : हृदयासाठी अत्यंत चांगला पदार्थ, शुगर आणि तणाव कमी करण्यात अत्यंत उपयोगी.

कसे खावे : मिठाई वापरून किंवा तसेच खाता येते.

किती खावे : आठवड्यात एक वाटी अक्रोड खाणे फायद्याचे राहते.
पालक

यातील घटक : पालकमध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन असते. सोबतच व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के सुद्धा असते.

फायदा : हृदय सदृढ होते तसेच वाढत्या वयाने कमी होणारी स्मरणशक्ती देखील वाढवता येते.

कसे खावे : सलाडमध्ये मिसळून त्याचप्रमाणे याला शिजवून किंवा कच्चे देखील खाता येते.

किती खावे : दिवसा कधीही एक वाटी


थोडे नवीन जरा जुने