तरुणांसाठी 'हे' वाचणे नक्कीच फायदेशीर ठरेल....


भारतातील आजच्या काळातील तरुण पिढी कमालीच्या ताणाचा सामना करत आहे. आधीच्या पिढय़ांच्या तुलनेत ही पिढी फार व्यग्र असते. खरेतर, ही पिढी नेमकी ‘व्यग्र’ नाही म्हणता येणार, ती तंत्रज्ञानाच्या आधीन असते.

भारतातील तरुण पिढी दररोज सरासरी १४० मिनिटे त्यांच्या मोबाइलवर व्यतित करते; जेन एक्स म्हणजेच ३१-४५ वर्षे वयोगटाच्या बाबतीत हे प्रमाण केवळ १२० मिनिटे आहे आणि ‘बेबी बूमर्स’ म्हणजे ४६-६५ वर्षे वयोगटासाठी हे प्रमाण ९० मिनिटे आहे. सकाळच्या वेळी प्रवास करत असताना मोबाइलमध्ये गुंग झालेल्या तरुणांकडे पाहिले की त्यांना मोबाइलचे लागलेले व्यसन लक्षात येते, मग हा प्रवास सार्वजनिक वाहतुकीतून असो किंवा केवळ चालत.

मोबाइलचा इतका वापर करण्याचे अनेकदा केवळ मनोरंजन, खरेदी किंवा मित्रमंडळींसोबत चॅटिंग करणे – स्मार्टफोनचा सतत सुरू असलेला वापर कामाच्या निमित्तानेही असू शकतो, असा अंदाज आहे. आजच्या काळातील तब्बल ८०% तरुण पिढी त्यांच्या बॉसपेक्षा जास्त काम करत असल्याचा दावा करते. कारण त्यांचे कामाचे तास बरेच असतात. भारतातील तरुणाईचे कामाचे तास जपानींपेक्षाही वाढतात. जपानी मंडळी दर आठवडय़ाला सरासरी ४६ तास काम करतात, तर भारतीय तरुणाई सरासरी ५२ तास! संसर्गजन्य नसलेले ६०% आजार तणावामुळे निर्माण होतात आणि ही चिंतेची बाब आहे.

प्रदूषित वातावरण, किटकनाशके फवारून तयार केलेले अन्न, अपुरी झोप अशी वैशिष्टय़े असलेल्या सिमेंटच्या जंगलात राहत असल्याने यामध्ये भर पडते आणि त्यामुळेच आजच्या काळातील तरुणांची तणावाची पातळी कमालीची आहे. जीवनाच्या प्रत्येक पैलूच्या बाबतीत सर्वोच्च स्थानी जाण्याच्या शर्यतीमुळे स्वत:कडून अवास्तव अपेक्षा केल्या जातात आणि त्यानंतर झपाटय़ाने बदलत्या जगाबाबतच्या भ्रमनिरासाचाही सामना करावा लागतो. यातून आणखी ताण निर्माण होतो.

आयुष्यातून ताण पूर्णपणे काढून टाकणे नक्कीच शक्य नाही किंवा इच्छितही नाही; परंतु त्यावर नियंत्रण आणण्याचे अनेक मार्ग आहेत. आणि त्यामध्ये कदाचित तंत्रज्ञान समाविष्ट नसेल! ताण कमी करण्यासाठी प्राचीन कालावधीपासून अवलंबला जाणारा एक उपाय म्हणजे गरम पाणी. गरम पाण्यामुळे दिवसभराचा शीण कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तणावपूर्ण विचार मागे टाकले जातात व त्यांना झेन डीटॉक्सिकेशन वातावरणात जाता येते. ताणमय दिवसाच्या शेवटी घरी जाऊन गरम पाण्याने अंघोळ करणे व ताजेतवाने होणे हा ‘मंत्र’ अवलंबण्यासाठी अतिशय सोपा व प्रभावी आहे.

वाफेमुळे केवळ मनालाच नाही, तर स्नायूंनाही आराम मिळण्यासाठी प्रचंड मदत होते, ही यामागची शास्त्रीय पार्श्वभूमी आहे. गरम पाण्यामुळे खात्रीने निवांत क्षण मिळतात दिवसभराचा थकवा जातो; मात्र त्यासाठी तुम्ही तुमचा फोन बाहेरच ठेवायला हवा! तुमच्या आकांक्षा व्यक्त होण्यासाठी ध्वनी महत्त्वाचे ठरतात आणि अचूक, तीव्र वातावरण तयार करतात. लंडनमधील रॉयल ब्रॉम्प्टनमधील नव्या संशोधनानुसार, अशा प्रकारे गायल्याने अस्थमा, ब्राँकायटिस व एम्फीसेमा असे फुप्फुसाचे आजार कमी होण्यासाठी मदत होते.

२०२१ मध्ये, भारतात कार्यरत असलेल्या लोकसंख्येमध्ये तरुणांचे प्रमाण ६४% असेल व त्यामुळे सध्याच्या युवा पिढीला गरम पाण्याच्या फायद्यांची गरज त्यांच्या आधीच्या पिढय़ांपेक्षा जास्त आहे.

It would certainly be beneficial for young people to read 'this'
थोडे नवीन जरा जुने