अशा प्रकारे ठेवा मेटाबॉलिझम संतुलित...!


मेटाबॉलिझम (चयापचय) ही एक प्रक्रिया असून त्यात सेवन केलेल्या खाद्यपदार्थांचे आणि पेयांचे ऊर्जेत रूपांतर करते. जर मेटाबॉलिझमची प्रक्रिया मंदावली तर शरीरातील ऊर्जा पातळी आपोआप कमी होईल. हे समजून घेताना बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजेच बीएमआर चांगला ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याची माहिती असायला हवी.

काय आहेत कारणे?
उंचपुर्‍या लोकांचे शरीर जास्त कॅलरी (उष्मांक)जाळते. ज्यांचे स्नायू जास्त असतात त्यांच्याबाबतही असे घडते. समान वयाच्या पुरुष आणि महिलांच्या शरीरातील मेदाच्या प्रमाणातही फरक असतो. पुरुषांमध्ये मेद कमी असतात. त्यामुळे ते जास्त कॅलरी जाळतात. एवढेच नाही तर वय वाढण्यासोबतच स्नायूंचे मांस कमी व्हायला लागते आणि कॅलरी जळण्याची प्रक्रिया मंदावते.

हे करावे

सकाळचा नाश्ता अवश्य करावा. न केल्यास मेटाबॉलिझम प्रक्रिया मंदावते.

जास्त काळ उपाशी राहू नये. जर योग्य वेळी नाश्ता आणि जेवण केले तर वजनही संतुलित राहते.

झोपण्याच्या दोन तास आधी अवश्य जेवण करावे.

1200 पेक्षा कमी कॅलरी घेतल्यावर मेटाबॉलिझम कमी होतो.

ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे.

करबोदके (कारबोहायड्रेट्स) घ्यावी आणि मेदयुक्त पदार्थ कमी करावे.

दररोज व्यायाम करावा. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे चालावे.

वजन उचलण्याचा व्यायाम करून स्नायू पिळदार करावेत.

शारीरिक हालचाली वाढवाव्यात.

दारूचे सेवन करू नये आणि भरपूर पाणी प्यावे.

Keep metabolism balanced in this way
थोडे नवीन जरा जुने