मेंदू कायम क्रियाशील ठेवायचाय ? मग हे करा
मेंदू हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. दिवस असो वा रात्र, मेंदू पूर्णवेळ काम करत राहतो. तो क्रियाशील आणि गतिशील ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी मेंदूला त्याच्यासारख्याच व्यायामाची गरज असते. तुम्ही मेंदूला व्यायामाची सवय लावल्यास तुम्ही नेहमी मानसिकरीत्या ऊर्जावान आणि सक्रिय राहाल.


आवडती पुस्तके वाचा


वाचन केल्याने मेंदूला पोषण मिळते, आहार मिळतो आणि तुमच्या ज्ञानातही भर पडते. तुम्हाला वाचनाची सवय नसल्यास लघुकथांच्या पुस्तकांपासून याची सुरुवात करा. हळूहळू प्रत्येक महिन्याला पुस्तकांची संख्या वाढत जाईल.


शब्दकोडे सोडवा


अनेकांना शब्दकोडे सोडवायला आवडते. काहींना सुडोकू खूप अवघड वाटते. जर आपला मेंदू तल्लख ठेवायचा असेल तर दररोज कमीत कमी एक सुडोकू शब्दकोडे अवश्य सोडवावे. इंटरनेटवर सुडोकू सोडवण्याच्या अनेक ट्रिक्सही देण्यात आल्या आहेत. त्या वाचून तुम्ही यात आवड निर्माण करू शकता.


संगीत ऐका किंवा शिका


संगीत फक्त कानाला किंवा मनालाच चांगले वाटत नाही, तर यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते आणि तो सक्रिय राहतो. एखादे नवीन वाद्य शिकल्याने मेंदूचा उजवा भाग क्रियाशील राहतो. कदाचित यामुळेच बहुतांश भारतीय कुटुंबांमध्ये संगीताचे शिक्षण घेणे गरजेचे मानले जाते.


सोप्या गणितांचा सराव


लहानपणी फार कमी मुलांना गणित विषय आवडतो, परंतु मोठे झाल्यानंतर बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराचे प्रश्न खूप सोपे वाटतात. दररोज स्वत:साठी एक मिनिटाचे सराव सत्र ठेवावे. यात जास्तीत जास्त सोप्या गणितांच्या प्रश्नांचा समावेश करावा.
थोडे नवीन जरा जुने