जाणून घ्या काय आहेत चष्माच्या नंबर कमी करण्याच्या टिप्स?
स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉपचा वापर वाढला. त्याच्या डोळ्यावर पडणा-या प्रभावामुळे दृष्टी अधू होण्याचे प्रमाण वाढू लागले. त्यातंच अपुरी झोप, सततची धावपळ, पोषक आहाराची कमतरता यामुळे कमी वयात चष्मा लागण्याचं प्रमाण बरंच वाढतंय. आयुर्वेदातील आणि काही घरगुती उपायातून चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो.


जाणून घ्या काय आहेत चष्माच्या नंबर कमी करण्याच्या टिप्स?
रात्री सहा ते सात बदाम पाण्यात भिजवून ठेवा. दररोज सकाळी खा.

त्रिफळा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. या पाण्याने डोळे धुवा.

अ, ब आणि क जीवनसत्त्वयुक्त गाजर खा.

राईच्या तेलाने तळव्यांना मालिश करा.

एक चमचा बडीशेप, दोन बदाम आणि थोडी खडीसाखर वाटून घ्या. रात्री झोपण्याआधी ग्लासभर दुधात घालून प्या.

दिवसभरात दोन ते तीन वेळा ग्रीन टी प्या. यातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे डोळे चांगले राहतात.

सुका आवळा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. या पाण्याने डोळे धुवा.

कानाच्या पाळीजवळ शुद्ध तुपाने मसाज करा. ही कृती दररोज करा.

जीरा आणि खडीसाखर एकत्र वाटून घ्या. चमचाभर तुपासोबत ही पूड खा.

आहारात पालक, मेथीसारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
थोडे नवीन जरा जुने