नैराश्यग्रस्त असलेल्या मुलांमध्ये सामाजिक ताळमेळाचा अभाव !


न्यूयॉर्क : नैराश्याने ग्रस्त मुलांना सामाजिक ताळमेळ म्हणजे इतरांमध्ये मिसळणे आणि शिक्षणासंबंधी विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एका ताज्या अध्ययनातून हे समोर आले आहे. या अध्ययनानुसार, अशा मुलांमध्ये समाजामध्ये मिसळणे आणि शैक्षणिक क्षमतेच्या अभावाचा सहा पटीने जास्त धोका निर्माण होऊ शकतो. 

शास्त्रज्ञांनी सांगितले की, ६ ते १२ वयोगटातील तीन टक्के मुले नैराश्याने ग्रस्त असल्याचा अंदाज आहे. मात्र आईवडील आणि शिक्षकांसाठी ते जाणून घेणे सोपे नाही. अमेरिकेतील मिसौरी विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक कीथ हरमन यांनी सांगितले की, आईवडील आणि शिक्षकांना मुलांच्या नैराश्याच्या पातळीबाबत विचारले जाते, तेव्हा ते साधारणपणे पाच ते दहा टक्क्यांचीच पातळी सांगतात.

 उदाहरणार्थ अशा मुलांना वर्गामध्ये मित्र बनविण्यात अडचण येते, असे शिक्षक सांगतात. मात्र ही मुले एकलकोंडेपाणासोबतच अभ्यासातही मागे राहतात.

Lack of social cohesion in depressed children
थोडे नवीन जरा जुने