जाणून घ्या ! बेलफळ आरोग्यासाठी किती लाभदायक आहे...


बेलफळ आणि बेदाणा हे दोन पदार्थ असे आहेत कि ते उन्हाळ्यात शरीराला शीतलता तर देतातच आणि सौंदर्यातही भर घालतात. 

बेलफळातील गार आणि त्यातील बियांभोवती असणारा चिकट पदार्थ उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्त आहे.

बेलाचे सरबत पोटाची सफाई करते. कांती सतेज करते. त्यातील बियांभोवतीच्या चिकट पदार्थात थोडी हळद, खस, गुलाबजल वा चंदन घालून त्याचा लेप त्वचेवर लावता येतो. त्याने कांती उजळते. बेलफळाची साल जाळून त्याच्या राखेचा दंतमंजन म्हणून उपयोग होतो. 

याने मुखदुर्गंधी दूर होऊन दात चमकदार बनतात . बेलाचे काजळ नेत्रज्योतीवर्धक आहे. बेलफळातील बिया तिळाच्या तेलात भिजत घालाव्यात.

२४ तासांनी बेलाच्या दिव्यासारखा वापर करून याचे काजळ करावे. हे काजळ बाटलीत भरून त्यात कपूर टाकावा. किमान २४ तासांनी काजळ डोळ्यात घालावे.

बेदाणा :

पोटासंबंधी विकारावर बेदाणे उपयुक्त आहेत. उन्हाळ्यातसरबत व बेदाण्याचे पाणी आरोग्यदायी व सौंदर्यवर्धक असते.

कपभर पाण्यात काही बेदाणे भिजत घाला. १२ तासांनी यातील ३/४ ग्लास पाणी प्यावे व बाकी शरीराला लावावे. एका तासाने स्नान करावे. स्नान करताना थोडी हळद चोळावी . बेलाच्या काजळाप्रमाणे बेदाण्याचेही काजळ बनवता येते. हे काजळ वर्षानुवर्षे चांगले राहते.

Learn! How beneficial is bloating for health
थोडे नवीन जरा जुने