जाणून घ्या ! जीवनातील सर्वाधिक आवश्यक कौशल्ये...


नाती : एकट्यानेच वाटचाल करून कधीच यशस्वी होता येत नाही. तुम्ही शांत स्वभावाचे असा किंवा बडबड्या स्वभावाचे. नाती तर घट्ट असायलाच हवीत. आपल्या आजूबाजूला काळजी घेणारी, पाठबळ देणाऱ्या व्यक्ती असल्या की, दिवसाची सुरुवात चांगली होते व जगणे अधिक समृद्ध होत जाते.

हास्य : जीवन हे अतिशय खडतर आहे. माणसाला रोजच जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यातून विरंगुळा, मनाला ऊर्जा, उत्साह म्हणून हास्यविनोद अतिशय आवश्यक आहे . स्वतःवर हसायला शिका, स्वतःची झालेली गंमत, करण्यात आलेली चेष्टा यावर हसायला शिका. आपण नेहमी स्वतःबाबत घडणान्या गोष्टींवर हसले पाहिजे. गंमत झाली, कुणी चेष्टा केली म्हणून चिडता कामा नये. 

सकारात्मकताः आयुष्य हे कठीण आहे हे आपल्याला माहीत आहे. मात्र एकदा का तुम्हाला अडचणींवर मात करण्याची सवय लागली की, आयुष्य सुखकर होते. त्यामुळे चेहऱ्यावर हास्य ठेवा. स्वतःच्या क्षमताचे , गुणवत्तेचे कौतुक करा. स्वतःला प्रोत्साहन द्या. चिंता करत बसू नका.

निवांतपणा : तुम्ही रोजच दमून जाईपर्यंत काम करत राहिलात, तर अनेक कामे पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे रोजच्या धावपळीत काही निवांत वेळ स्वतःसाठी, कुटुंबासाठी बाजूला काढून ठेवा. त्या वेळेत कामाचा आणि ऑफिसचा विचार अजिबात करू नका. मायेच्या व्यक्तींशी गप्पा मारा, एकत्रित जेवण करा. शांत व पुरेशी झोप घ्या. त्यातून तुमची कार्यक्षमता नक्कीच वाढते. 

आनंदः आयुष्याच्या प्रवासातील सुखद क्षणांचा आनंद घ्या. आणखी एक. काम मनासारखे झाल्याशिवाय हसायचे नाही वा छोट्या गोष्टींबद्दल आनंद व्यक्त करायचा नाही हा मूर्खपणाचा विचार आहे. अनेकदा लोक कामात इतके गढून जातात की, आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या चांगल्या घटना, आनंदाचे क्षण यांना ते मुकतात. रोजच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी, हास्यविनोद घडत असतात. त्याचा आनंद घ्यायला शिका.

Learn! Most essential skills in life
थोडे नवीन जरा जुने