जाणून घ्या ! आपल्या शरीरातील मल्टीव्हिटॅमिन्सचं महत्व...


मल्टीव्हिटॅमिन्सना फार महत्त्व आहे. आहारातून हे जास्त जात नाहीत किंवा आपल्या शरीरात व्हिटॅमिन्सच्या सप्लीमेंट तयारही होत नाहीत. त्यामुळे ती गरज अपूर्ण राहते म्हणून मग ते बाहेरून घ्यावे लागते.

डिटॉक्स झाले की कॅल्शियम सप्लीमेंट सकाळी घ्या. आपण म्हणतो, ‘‘मी व्यवस्थित खातो. माझा खाण्या-पिण्याचा काही प्रॉब्लेम नाही.’’ पण मग रक्ततपासणी केली की कॅल्शियम, व्हिटॅमिन किंवा बी-कॉम्प्लेक्सची कमतरता निर्माण झाल्याचे दिसून येते. याची लक्षणे काहींमध्ये दिसतात तर काहींमध्ये दिसत नाहीत. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घेणे चांगले असते. 

बी-१२ या घटकामधून शरीराला लोह आणि फोलिक एसिड मिळते. खूप प्रमाणात थकवा, प्रचंड केस गळती, पायात गोळे येणे, निद्रानाश, त्वचेवर काळे डाग येणे ही सर्व बी-१२ च्या कमतरतेची लक्षणे आहेत. त्यासाठी गाजर, बीट, लाल सिमला मिरची, टोमॅटो, पपई, लाल भोपळा, लालमाठाची भाजी यांचा आहारात समावेश करावा. 

लाल मांस खाल्ल्याने बी-१२ वाढत नाही. बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी समतोल आहाराबरोबरच फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेऊ शकता. बी-१२ प्रमाणेच व्हिटॅमिन डी-३ सुद्धा महत्त्वाचे आहे. कोवळ्या उन्हात फिरायला, चालायला गेल्याने व्हिटॅमिनची पातळी चांगली राखली जाते.  

कोवळे ऊन अंगावर घेताना हातापासून कोपऱ्यापर्यंतचा भाग आणि चेहरा उघडा ठेवावा. हात, चेहरा झाकल्याने किंवा रणरणत्या उन्हात वॉक केल्याने व्हिटॅमिन-डी शोषले जाणार नाही.

Learn! The importance of multivitamins in your body
थोडे नवीन जरा जुने