जाणून घ्या ! किचन मधल्या ह्या काही खास टिप्स...



१. भेंडीची भाजी करताना त्यात दही घातल्याने भाजी चिकट होत नाही

२. जास्त लिंबाच्या रसासाठी पाच ते दहा मिनिटं लिंबू कोमट पाण्यात भिजवावं.

३. सुकं खोबरं तुरडाळीत ठेवलं तर खराब होत नाही

४. फळभाज्या मऊ किंवा शिळ्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्याने टवटवीत होतात.

५. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात मीठ टाकल्याने साल लवकर निघतात.

६. साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात चार ते पाच लवंग ठेवाव्यात.

७. भजीच्या पीठामध्ये मक्याचं पीठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात.


८. कच्ची केळी ठंड पाण्यात ठेवल्याने आठवडाभर टवटवीत राहतात.

९. तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर तांदळाचा दाणा मोकळा आणि मोठा होतो.

१०. भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतलं मीठ टिकून राहतं.

११. तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो.

१२. डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.

१३. चिमटीभर हळद बटाट्यांमध्ये घातल्यास ते लवकर उकडतात.

१४. पुऱ्यांच्या कणकेत साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.

१५. लिंबाच्या रसाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा.

१६. पालेभाज्या सुकल्यावर पाण्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्यास भाज्या ताज्या होतात.

१७. कोफ्टा किंवा इतर पदार्थ तेलात तळताना थोडं मिठ घालावं. जेणे करून तेल त्या पदार्थात सोसलं जात नाही.

१८. कडुनिंब शिल्लक असल्यास तो तळून डब्यात भरून ठेवल्याने जास्त काळ टिकतो.

Learn! These are some special tips from the kitchen
थोडे नवीन जरा जुने