जाणून घ्या ! अनोळखी मुली काय विचार करतात ?


तुम्ही घरातून बाहेर पडताच तुम्हाला रस्त्यावर, कार्यक्रमात किंवा तुम्ही जाल त्या ठिकाणी अनेक मुली दिसतील. त्या मुली जशा तुम्हाला अनोळखी असतात तसेच, तुम्हीही त्या मुलींसाठी अनोळखी असता. त्यामुळे अनोळखी मुलाबाबत म्हणजेच तुमच्याबाबत त्या मुली काय विचार करतात, हे तुम्हाला माहित आहे का ? नाही ना..! म्हणूनच जाणून घ्या …
नजर चुकवून पहायला पाहिजे

– अनोळखी मुलगा दिसला की, मुली विचार करतात वा काय सुंदर आहे हा. पण याची नजर चुकवूनच याच्याकडे पाहिलेपाहीजे नाहीतर, उगाच भाव खायचा.

याच्या खूप गर्लफ्रेंड असतील

– सुंदर आणि हॅंडसम मुलगा पाहिला की, मुलींच्या मनात पहिला विचार येतो. हा सुंदर आहेच पण याच्या बऱ्याच गर्लफ्रेंड असतील, त्यामुळे आपण याच्या नादी नकोच लागूया. उगाच पोपट व्हायचा.

गर्लफ्रेंड कशी असेल

अनेक मुलींना त्या मुलापेक्षा त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये इटरेस्ट वाटतो. याचा अर्थ दुसरा-तिसरा काही नाही. तर, त्या मुलाच्या गर्लफ्रेंडवर त्या जळत असतात. आपल्याला आवडलेल्या अनोळखी मुलाच्या गर्लफ्रेंडबाब त्या सतत विचार करू लागतात.

याचे काहीच कळत नाही

– शी..बाबा..! हा फोनवर किती हळूहळू बोलतोय. याचे काहीच कळत नाही. तो आपल्या मित्राबरोबरच बोलत असेल ना? की त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर बोलत असेल.

समजदार असेल का

– हा दिसायला तर सुंदर दिसतोय. हॅंडसम आहे पण, तो तितका समजदारही असेल का? जाऊदे अपल्याला काय करायचेय. सहज पाहिलं तर, पाहातही नाही, कसलाच भाव देत नाही. आपणच न पाहिलेलं बरं.

Learn! What do strangers think?
थोडे नवीन जरा जुने