खाद्य पदार्थांबाबत असलेले समज-गैरसमज जाणून घ्या...


फायदेशीर खाद्यपदार्थ हानिकारक आणि हानिकारक खाद्यपदार्थ फायदेशीर ठरू शकतात, हे थोडे आश्चर्यकारक वाटू शकते. मात्र, तज्ज्ञांच्या मते शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे. जाणून घेऊया अखेर हे कसे शक्य आहे याबाबत. 

भरपूर नाश्त्यामुळे शरीर सडपातळ राहते, हे खरे की खोटे?
खोटे : तज्ज्ञांच्या मते, भरपूर नाश्ता केल्यास ओव्हरइटिंग म्हणजेच भुकेपेक्षा जास्त खाण्याची समस्या नियंत्रित होते, मात्र शरीर सडपातळ राहत नाही. जवळपास 400 लोकांवर झालेल्या एका जर्मन संशोधनात आढळले की, भरपूर नाश्ता केल्यावरही लोक दुपारच्या व रात्रीच्या भोजनात तेवढाच आहार घेतात. ‘न्यूट्रिशनल जर्नल’नुसार वजन घटवण्यासाठी खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 

दररोज एक वा आठवड्यात दोन अंड्यांचे सेवन आरोग्यास फायदेशीर ठरेल?
कोणतीही सीमा नाही : सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की, आठवड्यात दोन वा तीन अंड्यांचेच सेवन केले पाहिजे, कारण त्यात कोलेस्टेरॉल अधिक असते. याउलट ‘फूड स्टँडर्ड एजन्सी’च्या मते, डॉक्टर जोपर्यंत मनाई करत नाहीत, तोपर्यंत अंड्यांचे यथेच्छ सेवन करता येईल. अंडे खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, याला काहीही वैज्ञानिक आधार नाही. कारण अनेक वर्षांपासून कोंबड्यांच्या आहारात बोन मील दिले जात नाही. तज्ज्ञांच्या मते, नव्वदच्या दशकात काही कारणांमुळे कोंबड्यांना भोजनात बोन मील देण्यावर बंदी घालण्यात आली. 

दृष्टी चॉकलेटने वाढते की नारळाने?
चॉकलेट : रीडिंग विद्यापीठातील संशोधकांच्या मते, 35 ग्रॅम डार्क चॉकलेटचे सेवन केल्यानंतर डोळ्यांची क्षमता 17 टक्क्यांनी वाढू शकते. कोकोमध्ये आढळणारे फ्लेवोनॉल्स हे अँटिऑक्सिडंट्स दृष्टी वाढवण्याचा हमखास उपाय आहे. कारण त्यामुळे नायट्रिक आम्लाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. रक्तवाहिन्या विस्तारण्यास व रेटिनापर्यंत रक्त पोहोचवण्यात ते उपयोगी असते. तज्ज्ञांच्या मते, डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनॉल्स अधिक असते, म्हणून ते मिल्क चॉकलेटपेक्षा अधिक फायदेशीर असते. 

स्ट्रॉबेरी सुरकुत्या, श्वासाचा दुर्गंध दूर करते की पोटाच्या समस्या?
पोटाच्या समस्या : स्ट्रॉबेरीचे भरपूर सेवन पोटाचा अल्सर आणि अधिक अल्कोहोल वा अ‍ॅस्पिरीन औषधामुळे होणा-या गॅस्ट्रिक समस्या कमी करते. बार्सिलोना विद्यापीठातील संशोधकांनी उंदरांवर केलेल्या संशोधनात आढळले की, स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यावर पोटाशी निगडित समस्या कमी करता येतात. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यानंतर लायसोझाइम या अँटिसेप्टिक एन्झाइमची (वितंकाची) निर्मिती होते. तो स्टमक लायनिंगला सुरक्षा प्रदान करतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. 

फळे व भाज्यांत किती सर्व्हिंग (आवश्यक प्रमाण) गरजेचे आहे, तीन, पाच की आठ?
आठ : बहुतेक लोक फळे व भाज्यांच्या केवळ तीन सर्व्हिंगही घेऊ शकतात. मात्र, एका संशोधनानुसार, पाच पोर्शनही दररोज पुरेसे नाहीत. युरोपीय अभ्यासकाच्या मते, प्रत्येक अतिरिक्त पोर्शनमुळे हृदयरोगांपासून बचाव होतो.

वेगवेगळ्या आठ देशांतील जवळपास तीन लाख लोकांवर केलेल्या या अभ्यासातून असे सिद्ध झाले की, आठ पोर्शन साइझ दररोज आहारात समाविष्ट केल्यास हृदयरोगांमुळे होणा-या मृत्यूचा धोका तीन पोर्शन साइझ घेणा-यांच्या तुलनेत 22 टक्के कमी करता येतो. 

दातांना जास्त हानिकारक सफरचंद की सोडा?
सफरचंद : जवळपास 1000 महिला व पुरुषांवर करण्यात आलेल्या संशोधनात आढळले की, नियमितरीत्या सफरचंदाचे सेवन करणा-या लोकांच्या दातांचे 3.7 पट जास्त नुकसान होते. किंग्ज कॉलेज लंडन डेंटल इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या मते, सफरचंद अ‍ॅसिडिक असते आणि त्यात चार चमचे साखर असते. तर सोडायुक्त पेयाच्या प्रत्येक कॅनमध्ये आठ चमचे साखर असते. सोडा ड्रिंक्स पिण्यासाठी सफरचंद खाण्यापेक्षा जास्त वेळ लागतो म्हणून सफरचंद जास्त हानिकारक आहे. सफरचंद खाल्ल्यानंतर पाणी प्यावे किंवा सोबत दूध/चीज घ्यावे. त्यामुळे त्यात असलेल्या कॅल्शियममधून अ‍ॅसिड न्यूट्रलाइझ होईल. 

डिप्रेशनमध्ये फायदेशीर चहा, कॉफी की चॉकलेट?
कॉफी : ‘जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिसिन असोसिएशन’च्या एका अहवालानुसार, ज्या महिला चार कप कॉफी एका दिवसात पितात, त्या खिन्न होण्याची शक्यता 15 टक्के कमी असते. लागोपाठ 10 वर्षे जवळपास 51 हजार महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनात त्यास दुजोरा मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते, कॅफिनमुळे मेंदूत सक्रिय होणा-या अ‍ॅडेनॉइसिन रसायनाचा परिणाम कमी होतो आणि खिन्नता दूर पळते. अँटिडिप्रेसेंटही अ‍ॅडेनॉइसिन रिसेप्टर्स ब्लॉक करतात. 

स्टेटिन्सचा उत्तम पर्याय कॅलामाइन टी की टोमॅटो?
टोमॅटो : तज्ज्ञांच्या मते, पिकलेले टोमॅटो व स्टेटिन्सच्या लहानशा डोसचा परिणाम सारखाच असतो. सर्वसाधारणपणे उच्च कोलेस्टेरॉल वा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवल्यावर स्टेटिन्स औषधांचेच सेवन केले जाते. केवळ 50 ग्रॅम टोमॅटोचे पेस्ट वा एक पिंट म्हणजेच 473 मि.लि. टोमॅटोचे ज्यूस हृदयरोगांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. पिकलेल्या टोमॅटोत असलेला लायकोपिन हा घटक कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. 25 मि.ग्रॅ. लायकोपिनची पूर्तता दररोज झाल्यास 10 टक्के एलडीएल म्हणजे अनावश्यक कोलेस्टेरॉल नियंत्रित करता येतो. टोमॅटोचे सेवन करताना स्टेटिन्सचेही सेवन सुरू राहील याची काळजी घ्या.

Learn about misconceptions about foods
थोडे नवीन जरा जुने