जाणून घ्या, आरोग्यासाठी वेलची किती फायदेशीर आहे...


मसाले हे भारतीयांच्या जीवनाचा आविभाज्य भाग आहेत. आपा कोणताही पदार्थ मसाल्यांशिवाय पूर्ण होतच नाही. जोवर मसाल्यांचा तडका पदार्थांवर लागणार नाही तोवर आपल्या मनाला शांती मिळत नाही. मसाल्यांमुळे जेवणाची लज्जत खऱ्या अर्थाने वाढते.चवीसाठी मसाले जेवढे आवश्यक असतात तेवढेच ते आरोग्यदायीही आहेत. मसाल्यांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे वेलची.

प्रत्येकाच्या घरात वेलची असतेच. वेलची खूप गुणकारी आहे. वेलचीच्या सेवनानं वाढत चाललेलं वजन कमी होतं.आयुर्वेदात म्हटलंय की, शरीरातली चयापचय क्रिया वेलचीनं सुधारते. त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते.


वेलचीनं कॉलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. तसेच वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो.वेलची चहात टाकून घेतली की पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. वेलचीनं पोटातला गॅसही निघून जातो.
Learn how beneficial cardamom is for health
थोडे नवीन जरा जुने