जाणून घ्या,मानसिक तणाव कसा हाताळावा?
मानसिक ताणामुळे सतत द्विधा मनस्थिती असते.त्यामुळे चुकीच्या व वास्तव विचारांचे प्रमाण वाढते. हे विचार कमी करण्यासाठी आपण रोजचं बॅलन्स शीट तयार करायचं. तनावयुक्त स्थितीमध्ये फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. मानसिक ताण वाढला की श्वसन व शरीरातील स्नायूंवर सरळ सरळ प्रतिकूल परिणाम होतो.
मानसिक ताणाचे व्यवस्थापन आपण प्रत्येक जण करू शकतो. आपल्या स्वतः मधील तणाव कमी करण्यासाठी तनाव निर्माण करणारे तण उपटून टाकायला हवे,आणि त्यासाठी सर्वप्रथम आत्मसमर्पणाची सवय सोडून वस्तुनिष्ठ विचार करण्याची सवय अंगी बाणवायला हवी.

मानसिक तणावामुळे सतत द्विधा मनस्थिती असते.त्यामुळे चुकीच्या व अवास्तव विचारांचे प्रमाण वाढते.हे विचार कमी करण्यासाठी आपण शारीरिक, मानसिक, व आर्थिक शक्ती, श्रम, वेळ कुठे व कसा खर्च करतो आणि कोणत्या गोष्टीसाठी किती किंमत देतो याची नोंद करायची.

या नोंदीच् आपणच विश्लेषण करायचं व मानसिक ताणाची खर्चाची बाजू कमी करत नेत मन:स्वास्थची जमेची बाजू वाढवीत नेण्याचा प्रयत्न रोज करत जायच.यामुळे आपण आपल्यावर अधिकाधिक चांगले नियंत्रण ठेवू शकतो. मानसिक ताण वाढला की, श्वसन व शरीरातील स्नायूंवर सरळ सरळ प्रतिकूल परिणाम होतो.

ताण कमी करण्यासाठी श्वसन नियमन व स्नायू शिथिल करण्याच्या तंत्राचा वापर करणे उपयुक्त ठरते. तनावयुक्त स्थितीमध्ये फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.बसल्याबसल्या श्वास बाहेर सोडताना हाताची मुठ सैल करा. असे पाच-सहा वेळा केल्यावर तणावाची लाट हलकेच ओसरेल हे नक्की!

या शिथिल तंत्रामुळे मनाची शक्ती वाया जाणार नाही. थकवा जाणवनार नाही. व आपल्याला शांत व प्रसन्न वाटतं. याचबरोबर तान व्यवस्थापनात नियमित व्यायाम व योग्य चौरस आहार पुरेशी झोप यांची आवश्यकता असते.
Learn how to deal with stress.
थोडे नवीन जरा जुने