जाणून घ्या केळीच्या सालीचे आरोग्यदायी फायदे
एक केळ दररोज खाऊन कोणताही व्यक्ती आयुष्भर निरोगी राहू शकतो. केळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन आणि पोषक तत्व आढळून येतात. संशोधनानुसार केळीच्या सेवनाने तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता.

तुम्हाला हे माहिती आहे का? फक्त केळच नाही तर केळाची सालही आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. तुम्ही केळ खाऊन साल फेकून देत असाल तर असे करू नका. आज आम्ही तुम्हाला केळीच्या सालीचे काही खास उपाय सांगत आहोत.

हलक्या हाताने केळीच्या सालीने चेहर्‍यावर पाच मिनिटांपर्यंत मालिश केल्यास पिंपल्स नष्ट होण्यास मदत होते. या सालीची पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावल्यास चेहरा उजळतो.

केळीच्या सालीने दात घासल्यास दात चमकतात.

एखाद्या मधमाशीने, किड्याने दंश केला असेल तर त्याठिकाणी केळीची साल बारीक करून लावल्यास आराम मिळेल.

सोरायसिस झाल्यास त्यावर केळीची साल बारीक करून लावा. यामुळे डाग निघून जातील तसेच आराम मिळेल.

डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर केळीची साल थोडावेळ डोळ्यावर ठेवा, आराम मिळेल.


चेहर्‍यावरील सुरकुत्यांमुळे त्रस्त असाल तर अंड्याच्या बलकामध्ये केळीची साल मिसळून चेहर्‍यावर लावल्यास सुरकुत्या नष्ट होतील. ही पेव्स ५ मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवावी, त्यानंत चेहरा स्वच्छ धुवावा.

शरीरात एखाद्या ठिकाणी वेदना होत असतील तर त्याठिकाणी ३० मिनिटांपर्यंत केळीची साल लावावी, आराम मिळेल.

लेदर बॅग, बेल्ट, शूज खराब दिसू लागले तर त्यावर केळाची साल रगडल्यास चमक येईल.

केळ खाण्याचे फायदे -


केळामध्ये सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज तत्व असतात. याच कारणामुळे केळ खाल्ल्यानंतर लगेच एनर्जी मिळते.

कच्च्या केळामध्ये स्टार्च व सेल्युलोज जास्त प्रमाणात असते. केळ पिकले, की या स्टार्चचे रूपांतर सुक्रोज, फ्रुक्‍टोज व ग्लुकोज या साध्या रेणूंच्या कार्बोहायड्रेट्‌समध्ये होते म्हणून कच्चे केळ बद्धकोष्ठतेवर व पिकलेले केळे जुलाबावर खाण्यास दिले जाते.

एका संशोधनानुसार केळीमध्ये असलेल्या ट्रायप्टोफन नावाच्या प्रोटीनमुळे मानसिक ताण कमी व्हायला मदत होते. त्यामुळे सतत कामाचा ताण असणाऱ्या व्यक्तींच्या आहारात केळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.


थोडे नवीन जरा जुने