चेहरा तजेलदार करण्यासाठी डाळींबा मधील 'हे' औषधी गुण जाणून घ्या !


लालचुटूक दिसणा-या डाळींब या फळाचा उगम इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान या ठिकाणी झाला असं मानलं जातं. डाळींबाचं वनस्पतीशास्त्रीय नाव ‘प्युनिका ग्रॅनेटम’ आणि संस्कृतमध्ये ‘दाडिंब’ असं आहे. डाळींबाचं झाडं तीन ते पाच मीटर उंच असतं. 

डाळींबाचं वैशिष्टय म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची माती चालते. अगदी निकस निकृष्ट ते सुपीक. या झाडाला नियमित आणि पुरेसं पाणी लागतं. 

जास्त पाणी झालं तर फळे पिकण्याअगोदर गळून पडतात किंवा पिकलेल्या फळाला तडे जातात. डाळींबाच्या पिकास थंड व कोरडं हवामान उपयुक्त असतं. डाळींबाचे दाणे छोटे असतात पण ते सोलायला थोडे कष्ट घ्यावे लागतात. डाळींब हे उत्तम पित्तनाशक आहे. 

अशा या डाळींबात साखरेचे प्रमाण दहा ते सोळा टक्के आहे. डाळींब आयुर्वेदीक औषधांमध्ये वापरलं जातं. या फळात पाणी, प्रथिने, स्निग्ध आणि पिष्टमय पदार्थ असून त्यात मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम यांसारखे अन्नघटक असतात.
डाळींबाचा रस आणि खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होतं.

जुलाब होत असेल तर डाळींबाची साल उगाळून त्याचं चाटण घ्यावं, लगेच आराम मिळतो.

कावीळ व कुष्ठरोगात डाळींब द्यावं.

खोकला झाल्यास डाळींबाचा रस, मध एकत्र करून घ्यावं. खोकला थांबतो.

चेहरा तजेलदार राहण्यासाठी डाळींब उपयुक्त आहे.

हृदयातील अतिसुक्ष्म रक्तवाहिन्या मोकळ्या करण्याचं काम करतं.
थोडे नवीन जरा जुने