ब्रा घालण्याचा पद्धतीवरून महिलांचे व्यक्तीत्व जाणून घ्या


नुकताच एक रिसर्च करण्यात आला असून त्यात सांगण्यात आलं आहे की, महिलांच्या ब्रा परिधान करण्याच्या पद्धतीवरून त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल जाणून घेता येतं. पॅटी वूड या बॉडी लॅंग्वेज एक्सपर्टने नुकताच रिसर्च केला आहे. ती जॉर्जियामध्ये इमोरी युनिव्हर्सिटीमध्ये ह्यूमन बिहेविअर एक्सपर्ट सुद्धा आहे. तिने याबाबत जाणून घेण्यासाठी एक वेगळाच रिसर्च केलाय.
पॅटी वूडने केलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, ब्रा परिधान करण्याची पद्धत कोणत्याही महिलेच्या नेचरचं विवरण करते. यानुसार चार प्रकारचे व्यक्तीत्व असलेल्या व्यक्ती आढळतात. एक ते जे आपली छाप सोडण्यात माहिर असतात. एक ते जे सपोर्ट करतात. एक ते जे सर्व गोष्टी ध्यानात ठेवून कमीत कमी चुका करण्यात विश्वास ठेवतात आणि एक ते जे कुणापासूनही प्रभावित नसून स्वत:चं जीवन जगण्यात विश्वास ठेवतात.

पॅटीनुसार, त्या महिला ज्या ब्राला मागच्या बाजूने हुक लावतात त्यांचं वागणं समर्थक असल्यासारखं असतं. त्या पारंपारिक असतात आणि त्यांना जे नेहमी सांगितलं जातं ते त्या मानून जगणा-या असतात. रिसर्चमध्ये समोर आलंय की, त्या महिला ज्या ब्राला समोरून हुक लावून मागच्या बाजूला फिरवतात त्या लोकांवर छाप सोडणा-या असतात. त्यांना लोकांच्या नजरेत असणं आवडतं.

शोधानुसार, जर ज्या महिलांच्या ब्राचा हुक समोरच्या बाजूला असतात त्या महिला कमांडिंग असतात. त्या वेळ घालवण्यात अजिबात विश्वास ठेवत नाहीत. आणि आपलं म्हणनं कसं बरोबर आहे हे सांगण्यासाठी नेहमी पुढे असतात. आणि ज्या महिला एखाद्या शर्ट सारख डोक्यावरून ब्रा घालतात त्या महिला चुका पुन्हा पुन्हा न करणा-या असतात.

थोडे नवीन जरा जुने