चला जाणून घेऊया डार्क स्कीनचे फायदे
सावळ्या किंवा डार्क स्कीनला नेहमीच वाईट समजलं जातं. सावळ्या रंगांच्या लोकांनी काळं म्हणून चिडवलं जातं. सावळेपणामुळे अनेकांना अनेक प्रकारचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेकांना यामुळे डिप्रेशन येतं.

याचाच परिणाम म्हणजे सावळा रंग घालवण्यासाठी आणि गोरा रंग मिळवण्यासाठी हजारो रूपयांच्या क्रिम बाजारातून विकत घेतल्या जातात. त्यामुळे गोरा रंग देणा-या क्रिमचं मार्केट वाढलं आहे. मात्र सावळा रंग किंवा डार्क रंग असणं वाईट नाहीतर फायद्याचा आहे. चला जाणून घेऊया डार्क स्कीनचे फायदे.

भास्कर डॉट कॉम या वेबसाईटला डॉ.मीतेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळ्या किंवा डार्क स्कीनमध्ये कलर पिगमेंट मेलानिनचं प्रमाण जास्त असतं, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया काही फायदे.


डार्क स्कीनमध्ये मेलानिनचं प्रमाण अधिक असतं. ते सूर्याच्या हानिकारक अल्ट्रा-वायलेट किरणांनापासून आपला बचाव करतं.

स्कीनमध्ये असलेल्या डार्क पिग्मेंटेशनमुळे गो-या स्कीनच्या तुलनेत स्कीन कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.

डार्क स्कीनमध्ये असलेल्या मेलानिन सेंट्रल नर्व्हस सिस्टमला नुकसान पोहोचवणा-या खतरनाक पॅरासाईटपासून आपली रक्षा करतं.

मेलालिन इन्फेक्शन पसरवणा-या बॅक्टेरियापासून बचाव करतो. गो-या स्कीनच्या तुलनेत स्कीन इन्फेक्शन कमी होतात.

डार्क स्कीनमध्ये असलेलं मेलानिन स्कीनवर सुरकुत्या येण्यापासून रोखतं. त्यामुळे तुम्ही अधिक यंग आणि ताजेतवाणे दिसता.

मेलानिनमुळे शरिराची इम्युनिटी म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी खोकला यांसारखे रोग होत नाही.

मेलानिन महिलांमध्ये हेल्दी एग प्रॉडक्शनमध्ये मदत करतो. यामुळे प्रेग्नसी संबंधीत अनेक समस्यांपासून सुरक्षा मिळते.


थोडे नवीन जरा जुने