मोबाइलचा नाद सोडावा म्हणून लढवली हि शक्कल
बीजिंग: चीनमधील फुझोऊ शहरात फुजियान नॉर्मल युनिव्हर्सिटीचे वाचनालय २४ तास सुरू असते. वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी खोली, झोपण्याची केबिन व कॅफेटेरिया आदींची सुविधा आहे. अभ्यास संपवून विद्यार्थी येथे झोपूही शकतात.
विद्यार्थ्यांनी मोबाइलचा नाद सोडून आपला सर्व वेळ पुस्तके वाचण्यात घालवावा, असा उद्देश विद्यापीठाचा आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने वाचनालयात मोठमोठे सोफे व आरामदायी खुर्ची -टेबल ठेवले आहेत.

मुले आपला बहुतांश वेळ मोबाइल पाहण्यात घालवतात, त्यामुळे ते नीट अभ्यास करत नाहीत, असे विद्यापीठ प्रशासनास वाटते. विद्यार्थ्यांना पुस्तके पाहण्यास मिळाली तर त्यांना अभ्यासाची-वाचनाची गोडी लागेल , असे वाटते.


थोडे नवीन जरा जुने