"अशा" प्रकारे घरच्या घरीच करा कॅलरी बर्न !
वजन घटवण्यासाठी आणि कॅलरी बर्न करण्यासाठी व्यायामशाळेत जायला हवे असे काही नाही. दैनंदिन अ‍ॅक्टिव्हिटीजद्वारेही कॅलरी बर्न होऊ शकते. प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटी कॅलरी बर्न करण्यास साहाय्यभूत ठरते. मात्र प्रत्येकास हे माहीत असायला हवे की, कोणत्या अ‍ॅक्टिव्हिटीमुळे किती कॅलरी बर्न होते. अशाच काही अ‍ॅक्टिव्हिटीजबाबत जाणून घेऊया. 

शॉपिंग करताना - एका संशोधनानुसार, जर तुम्ही एक तास शॉपिंग करत असाल, तर ही पद्धत कॅलरी बर्न करण्यासाठी परिणामकारक आहे. किराणा सामान विकत घेणे, कार्ट (सामान ठेवण्याची डाल) ओढणे आणि सामान कार वा रिक्षात ठेवण्यापर्यंत 243 कॅलरी बर्न होतात. 

ब्रश करताना - दंतवैद्यकांच्या मते, दोन वा तीन मिनिटांपेक्षा अधिक ब्रश करू नये. तीन मिनिटांत ब्रश करताना तुमची 5.7 कॅलरी बर्न होते. 

सफाई करताना - घरातील टेबल, अलमा-या वा रॅकची धूळ साफ करतानाही कॅलरी बर्न होते. जर तुम्ही घराची अर्धा तास डस्टिंग अर्थात सफाई केली तर 80 कॅलरी बर्न होते.

टीव्ही पाहताना - टीव्ही पाहताना भलेही तुम्ही सोफ्यावर आराम करत असलात तरी शरीराची कॅलरी बर्न होते. तुम्ही एखादा तास टीव्हीवरील कोणताही कार्यक्रम पाहत असाल तर 72 कॅलरी बर्न होते. 

कपडे गोळा करताना - धुतलेले कपडे वाळल्यानंतर गोळा करताना अलमारीत ठेवल्यासही कॅलरी बर्न होते. जर तुम्ही तुमचे व तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे कपडे गोळा करण्यास अर्धा तास घेत असाल तर तुमच्या शरीराची 72 कॅलरी बर्न होईल. 

बागकाम करताना - जर तुम्ही बागेची देखभाल स्वत: करत असाल किंवा कधीकधी करत असाल तर ती कायम ठेवा. दोन तास बागेत कापणी वा छाटणी केल्यास 648 कॅलरी बर्न होते.

Make Calories Burned at Home "This Way"!
थोडे नवीन जरा जुने