आणि 5 मिनिटातच त्वचा चमकदार बनवा




चमकणारा चेहरा कुणाला आवडत नाही. परंतु जगातील अनेक लोक फक्त विचार करतात, की आपला चेहरा कसा चमकू शकतो. तसे तर परफेक्ट त्वचा करणे सोपे काम नाहीये. त्यासाठी योग्य खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे लागते. तसेच त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे असते.

परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या त्वचेकडे बारकाईने लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे त्वचा सुकते. तुम्हालाही अशीच समस्या असेल, तर आम्ही आज तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा चेहरा चमकू लागेल आणि सुंदर दिसू लागले.

दोन छोटे चमचे बेसनपीठात दोन चमचे हळद मिसळा. या मिश्रणात दहा थेंब गुलाब जल आणि दहा थेंब लिंबाचा रस मिसळून त्याला चांगले हलवा. त्यानंतर कच्च्या दुधात मिसळून त्याचे थोडे पातळ लेप बनवा. हा लेप आंघोळीपूर्वी चेह-यावर लावा आर्धा तासाने चेहरा पाण्याने धुवा. तुमचा चेहरा तजेलेदार दिसायला लागेल.

रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास गाजराचा ज्यूस पिल्याने त्वचेचा रंग उजळतो.

एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाच्या रसाचे मिश्रण चेह-यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.

मुल्तानी मातीमध्ये गुलाब जल मिसळून लावल्यानेसुध्दा त्वचा चमकू लागते.

लिंबाची पाने त्वचेची रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. याच्या वापराने चेह-यावरील पिंपल्स जातात. चार-पाच लिंबाचे पान मुल्तानी मातीमध्ये टाकून त्याला चांगले घोटून घ्या. याचा लेप चेह-यावर लावल्यानंतर 15 मिनीटांनी चेहरा धुवा.

केळीने चेह-यावरील सुरकत्या नष्ट होतात. पिकलेल्या केळीचे पेस्ट करून चेह-यावर लावल्याने चेह-याची चमक वाढते.

1/2 चमचा चिरंजी 2 चमचे दुधात भिजवा. काही तासांनी त्याला घोटून त्याचे पेस्ट बनवा. ही पेस्ट 15 मिनीट चेह-यावर लावा. असा पॅक नियमित पध्दतीने दीड महिने लावा. तुमच्या चेह-याचा रंग उजळायला लागेल.

सातूचे पीठ, हळद, मोहरीचे तेल पाण्यामध्ये मिसळून पावडर बनवा. रोज त्वचेची या तेलाने मालिश करून गरम पाण्याने आंघोळ करा.


कच्चे दुध त्वचेसाठी खूप फायद्याचे असते. थोड्या कच्चे दुधाने चेह-यावर मालिश करा. सुकल्यानंतर त्यावर मीठ लावून हळूवारपणे मसाज करा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात.
बेसनपीठ, हळद, लिंबू, गुलाब जल यांना एकत्र करून त्यांचे लेप बनवून त्याला आठवड्यातून एकदा लावा.

दोन चमचे काकडीचा रस, अर्धा चमचा लिंबूचा रस, थोडीसी हळद तिन्ही पदार्थ मिळून ते चेह-यावर लावा.

एक चमचा मध चेह-यावर हलक्या हाताने लावून 15-20 मिनीट ठेवा. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. तेलकट त्वचेवर मधाचे चार-पाच थेंब लिंबूचा रस टाकून तेसुध्दा चेह-यावर लावू शकता.


चार चमचे मुल्तानी माती, दोन चमचे दही, एका लिंबूचा रस हे सर्व एकत्र मिसळून त्वचेवर लावा. हा लेप चेह-यावर अर्धा तास ठेवा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

काकडीचा रस त्वचेचा काळा रंग दुर करण्यास मदत करतो. काकडीचा रस रोज 15 मिनीट लावा. तुमचा चेहरा उजळू लागेल.

डोळ्याखाली काळे वर्तूळ असतील तर डोळ्याच्या आजूबाजूला बटाट्याच्या साहाय्याने हलक्या हाताने मालिश करा. काही दिवसाने काळे वर्तूळ दुर होतील.


रोज कमीत-कमी आठ ते दहा ग्लास पिल्याने त्वचेवरील सुरकत्या नष्ट होतात आणि चेह-याची चमक वाढते.

स्वस्थ त्वचा आणि स्वस्थ शरीरासाठी रोज कमीत-कमी 8 तास झोप गरजेची आहे.

अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते. अक्रोड खाल्याने आणि त्याच्या तेलाने मालिश केल्याने चेह-याची चमक वाढते.

संत्र्याचा ज्यूस नियमित प्यावा. संत्र्याचे साल वाळवून त्याची पेस्ट बनवून ती चेह-यावर लावल्याने चेहरा उजळतो.


ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर असते. ग्रीन टीच्या नियमित सेवनाने त्वचेवरील डाग नष्ट होतात.

डाळिंबांमध्येसुध्दा अँटीऑक्सिडेंट भरपूर असते. याच्या नियमित सेवनाने व्यक्ती आयुष्यभर तरूण दिसण्यास मदत होते. त्यामुळे रोज डाळिंबाचा ज्यूस पिल्याने त्वचा उजळते.

जेवणात रोज डाळींचा सामावेश करावा. डाळींमध्ये जीवनसत्व असते. त्यामुळे त्वचा चमकदार बनते.

जेव्हा तुम्हा घराबाहेर पडता तेव्हा सनस्क्रिन लावायला विसरू नका. सूर्याच्या किरणांनी त्वचेच्या रंगात फरक पडतो.


थोडे नवीन जरा जुने