आचार्य चाणक्य सांगतात या गोष्टी कधीच कोणालाही सांगू नयेत, अन्यथा...
आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये चार अशा गोष्टींविषयी सांगितले आहे, ज्या नेहमी गुप्तच ठेवाव्यात. जे पुरुष या गोष्टी इतरांना सांगतात, त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
आचार्य चाणक्य सांगतात की....

अर्थनाशं मनस्तापं गृहिणीचरितानि च।

नीचवाक्यं चाऽपमानं मतिमान्न प्रकाशयेत्।।

आचार्य सांगतात, या जगात असा एकही व्यक्ती नाही ज्याला कधीही धनहानीचा सामना करावा लागला नाही. एखादे मोठे नुकसान झाले असेल तर त्याविषयी जास्त चर्चा करू नये, कारण ही गोष्ट सर्वांना समजल्यास आर्थिक कामामध्ये आपल्याला कोणीही मदत करणार नाही. पैशांची मदत अशाच लोकांना केली जाते, जे पहिल्यापासूनच सक्षम आहेत.

प्रत्येक घरामध्ये कधी न कधी पती-पत्नीमध्ये वाद होत असतात, अशा वाद-विवादांची चर्चा घराबाहेर इतरांसमोर करू नये. पुरुषाने आपल्या पत्नीच्या स्वभावाशी संबंधित गोष्टी गुपित ठेवाव्यात. पत्नीशी संबंधित कोणतीही चर्चा इतर लोकांसमोर केल्यास भविष्यात भयंकर अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता वाढते.

आपण आपल्या मनाचा संताप म्हणजे दुःख कोणासमोरही उघड करू नये. अशा गोष्टीमुळे कोणताही लाभ तर होतच नाही उलट समाजात आपण हास्याचा विषय अवश्य बनतो. असे अनेक लोक आहेत, ज्यांना इतरांचे दुःख पाहून सुख मिळते.

आचार्य सांगतात की, जीवनात आपल्याला एखाद्या नीच व्यक्तीमुळे अपमानित व्हावे लागले तर ती घटना गुपितच ठेवावी. अपमानाशी संबधित घटना समाजात सांगितल्यास आपण हास्याचा विषय बनतो.

थोडे नवीन जरा जुने