कधीच कोणालाही कमी लेखू नका.

प्रत्येकच गोष्टीची स्वतःची अशी किंमत असते. ती व्यक्ती, वस्तू किंवा अगदी अंकदेखील एका विशिष्ट वेळी कोणत्या ठिकाणी आहेत, त्यावरून त्यांचं महत्त्व किंवा किंमत बदलत असते. म्हणजे, अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर अंकगणिताचं घेता येईल. 


जेव्हा आपण एखादी गोष्ट कमावण्याचा विचार करतो, तेव्हा २ हा आकडा, १ पेक्षा मोठा ठरत असतो. पण, स्पर्धेची वेळ अली की मात्र, १ हा आकडा २ पेक्षा म् हाण ठरत असतो. म्हणूनच, बाह्य रूपावरून कधीही कोणाला लहाण किंवा मोठे समजू नये. कारण, त्या त्या व्यक्ती अथवा वस्तूची किंमत योग्य वेळीच कळत असते.

आणखी एक उदाहरण म्हणजे, वाळूमध्ये पङलेली साखर मुंगी खाऊ शकते. परंतु, आकाराने मोठा असला तरीही तीला ते शक्य होत नाही. म्हणून छोट्या माणसांना नेहमीच छोटे समजू नये. कधी कधी हीच आकाराने छोटी असलेली माणसेसुध्दा मोठ - मोठे काम करू शकतात. 

आपण स्वतःला मोठे वाटत असलो तरीही ते प्रत्येकवेळी तसेच असते, असेही नाही. मोठे असलो किंवा तशा समजात असलो तरीही त्याचा अहंकार बाळगण्यात काहीही अर्थ नसतो. कारण, अगदी सगळ्या स्पर्धेत पहिला क्रमांक येऊनहीं जेव्हा, पदक मिळण्याची वेळ येते, तेव्हा ते पदक मान झुकवल्यानंतरच गळ्यात पडते, हेही लक्षात असू द्या.

Never underestimate anyone
थोडे नवीन जरा जुने