मधुमेह असणाऱ्या रुग्णांना "ही" माहिती असलीच पाहिजे...

मधुमेहींना छातीत तीव्र स्वरूपाच्या कळा किंवा ब्रेक डाऊन, थंड घाम येणे आदी लक्षणे जाणवली नाहीत, तरी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्याच्या अन्य लक्षणांमध्ये अतिथकवा तसेच काम करत असताना श्वास लागणे आदींचा समावेश होतो.

हृदयविकाराचा झटका वेदनांशिवाय आला, तरी त्याने होणारी हानी ही नेहमीसारख्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होते तशीच असते. मधुमेहींमध्ये धोक्याच्या घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यास, हृदयविकाराचा झटका टाळण्यात किंवा लांबवण्यात मदत होऊ शकते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले. रक्तातील साखरेची पातळी सामान्य राखली, तर मधुमेहींच्या हृदयाचे दैनंदिन कामकाज सुधारते. मधुमेहाचे रुग्ण जीवनशैलीत काही बदल करून तसेच दिलेली औषधे घेऊन हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात.

यामुळे त्यांना धोक्याचे अनेक घटक टाळण्यात किंवा नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते. आरोग्यपूर्ण जीवनशैली हा आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी ठेवलेल्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा भाग असला पाहिजे. मधुमेह आणि हृदयविकार या दोहोंवरील उपचारांचा आरोग्यपूर्ण जीवनशैली हा महत्त्वाचा भाग आहे.

मधुमेहाचे काही रुग्ण केवळ जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने रक्तदाब आणि कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवू शकतात. शारीरिक व्यायामासारखे जीवनशैलीतील बदल तुमचा रक्तदाब नियंत्रणात आणू शकतात, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी आणि वजन आटोक्यात ठेवू शकतात आणि ताण कमी करू शकतात. आरोग्यपूर्ण आहार घेणे, आरोग्याला उपकारक ठरेल असे वजन राखणे यांमुळे हृदयविकाराच्या दृष्टीने धोकादायक घटकांवर नियंत्रण मिळवता येते.

मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून घेत राहावे. चाचण्यांमधून समस्या त्या जाणवण्यापूर्वीच उघडकीस येऊ शकतात. वेळेत उपचार मिळाल्यास संबंधित समस्या टाळल्या जाऊ शकतात किंवा लांबवल्या जाऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा आणि ते तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल, कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल, तुमच्या जीवनशैलीबद्दल जे प्रश्न विचारतील, त्यांची प्रामाणिक आणि संपूर्ण उत्तरे द्या.

Patients with diabetes must know "this"
थोडे नवीन जरा जुने