डाळींबाची ताजी साल वाटून पाण्यामध्ये मिसळून त्यानंतर ते पाणी गाळून पिल्यास काय होईल ?
डाळिंब हे एक पित्तशामक फळ असून एक आयुर्वेदिक औषधी आहे. डाळिंब हे आरोग्यासाठी उत्तम फळ आहे. डाळिंब आणि त्याच्या सालीतही भरपूर औषधी गुणधर्मही आहेत.


डाळींबाची ताजी साल वाटून पाण्यामध्ये मिसळून त्यानंतर ते पाणी गाळून पिल्यास महिलांच्या गर्भधारण क्षमतेमध्ये वृद्धी होते.


वारंवार चक्कर येत असेल तर...
डाळिंबाच्या झाडाचे १०० ग्रॅम हिरवे पान अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळून घ्या. एक चतुर्थांश पाणी शिल्लक राहिल्यानंतर त्यामध्ये ७५ ग्रॅम तूप आणि ७५ ग्रॅम साखर मिसळून घ्या. सकाळ-संध्याकाळ या मिश्रणाचे सेवन केल्यास चक्कर येणार नाही.
तोंड येत असेल तर...
डाळिंबाच्या झाडाचे 10 ग्रॅम हिरवे पानं अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळून घ्या. या पाण्याने सकाळी १० ते १२ गुळण्या करा. वारंवार तोंड येणार नाही.


50 ग्रॅम डाळिंबाच्या रसामध्ये १ ग्रॅम विलायची पूड आणि अर्धा ग्रॅम सुंठ पूड टाकून पिल्यास पुरुषांना लघवीतून वीर्य जाण्याच्या समस्येतून आराम मिळेल.


पोटदुखी व जुलाब होत असल्यास डाळिंबाचे दाणे आणि पानं एकत्र वाटून घ्या आणि अद्रकाच्या रसामध्ये हे मिश्रण टाका. या मिश्रणाचे सेवन केल्यास आराम मिळेल.


असे मानले जाते की डाळिंब सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. यामुळे हृदयासाठी हे खूप लाभदायक फळ आहे. दररोज एक ग्लास डाळिंबाचे ज्यूस पिल्यास तब्यत ठणठणीत राहते.


थोडे नवीन जरा जुने