यश मिळवण्यासाठी विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितलेल्या या टिप्स लक्षात ठेवा




छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचाच. त्यातून सतत तुमच्यातील नवचेतना जागेल.

आयुष्याचे ध्येय वयाच्या पंधराव्या वर्षीच ठरवा.

जीवन ही एक शर्यत आहे आणि परमेश्वर या शर्यतीचा “रायडर‘ आहे. चटके, फटके, वेदना सहन करा आणि या शर्यतीत जिंकण्याचा वज्रनिर्धार करा.

स्वतःची बलस्थानं, दुर्बलस्थानं ओळखा आणि संधीसह त्यासमोरील आव्हानांचा सर्वांगीण अभ्यास करा. झपाटून कामाला लागा.

योग्य वेळ आणि परफेक्ट प्लॅनिंगच्या जोरावर यशाची लढाई नक्कीच जिंकता येते.

प्लॅनिंग म्हणजे फार काही वेगळं नसतं. काय, कुठे, कसे आणि केव्हा मिळवायचे, याचे ऍडव्हान्समध्ये नियोजन करा आणि त्याचा ध्यास घ्या.

शांततेच्या काळात जास्त घाम गाळाल, तर प्रत्यक्ष युद्धात कमी रक्‍त सांडते. महाविद्यालयीन जीवनाच्या शांततेच्या काळात अधिक कष्ट करा. त्यामुळे प्रत्यक्ष करिअरच्या यशोशिखरावर जाताना कमी कष्ट घ्यावे लागतील.

स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. प्रसंगी काही नियम तोडा. अपयशाला तर अजिबातच घाबरू नका. पण यशोशिखरावर गेल्यानंतर देशासाठी, समाजासाठीच आपले जीवितकार्य माना.

केवळ स्वप्नं पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते. स्वप्नं प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस मोठा असतो.

यश शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपवणारं नसतं. महत्त्वाचा असतो तो आपला आत्मविश्वास.

जे निवडाल ते स्वतःच्या हिमतीनं निवडा. थांबलात तर मग दुसऱ्या कुणाला जमलं नाही ते “शिळं-पाकं‘ तुमच्या पदरात पडेल.

कितीही अपयश आलं तरी गांगरून जाऊ नका. पुन्हा पेटून उठा; अन्यथा आयुष्यभर सपाटून मार खाल.

“प्रेम, मदत आणि सेवा‘ ही त्रिसूत्रीच तुम्हाला कुठल्याही धर्मग्रंथातून मिळेल.


थोडे नवीन जरा जुने