टेन्शन, वाईट स्वप्न आणि अनिद्रा यासारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी 'हे' लक्षात ठेवा !


निरोगी शरीरासाठी शांत झोप खूप आवश्यक आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने झोपताना काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिल्यास शांत झोप लागते. यासोबतच टेन्शन, वाईट स्वप्न आणि अनिद्रा यासारख्या समस्या दूर होतात. शास्त्रानुसार जाणून घ्या, झोपण्याची योग्य पद्धत...

1. रात्री 10 वाजता झोपून सकाळी 4 वाजता उठणे शरीरासाठी उत्तम काळ आहे. तरुणांसाठी 6 तासांची झोप पर्याप्त आहे.

2. डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते.

3. झोपताना कुलदेवतेचे स्मरण करावे.

4. उत्तर दिशेला डोकं करून झोपल्यास हानी होऊ शकते.

5. पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यास ज्ञान वाढते.

6. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास धनलाभ होतो आणि शरीर निरोगी राहते.

7. पश्चिम दिशेकडे झोपल्यास चिंता वाढते.

9. डोकं आणि पायाकडे कोणत्याही प्रकारचा प्रकाश असू नये. प्रकाश डाव्या आणि उजव्या बाजूला कमीत कमी 5 हात दूर असावा.

10. झोपताना डोकं भीतीपासून कमीतकमी 3 हात दूर असावे.

11. सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये.

Remember to say 'this' to avoid problems like tension, nightmares and insomnia
थोडे नवीन जरा जुने