ऐच्छिक रक्तदान आवश्यक...
  •  मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही.
  • कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही.
  • रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते.
  • थॅलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना,कर्परोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते.
  • कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही.
  • आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिटमधून रक्त व रक्त घटक वेगळे केले जातात. (तांबडय़ा पेशी, रक्तिबबीका (प्लेटलेट्स) व प्लाझमा) अशापकारे आपल्या रक्तदानाने १ ते ३ रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

ऐच्छिक रक्तदानाची आवश्यकता :

अनेक वेळा रुग्णाकडे नातेवाईक, मित्रमंडळी नसल्यास व रक्तपेढीत आवश्यक तेवढे रक्त उपलब्ध नसल्यास बदली रक्तदाता उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. अशावेळी संधीचा फायदा घेऊन धंदेवाईक रक्तदाते जे अतिजोखमीचे असतात ते बदली रक्तदाता म्हणून पुढे येऊ शकतात व सुरक्षित रक्तपुरवठा धोरणास व गरजू रुग्णांस घातक ठरू शकतात. त्यामुळे बदली रक्तदाता टाळणेच रुग्णांच्या हिताचे आहे. त्यामुळे ऐच्छिक रक्तदान आवश्यक आहे. सुरक्षित रक्त पुरवठयासाठी ऐच्छिक रक्तदानाची नतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने रक्तदान करावे.

रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे : –

 वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत)
 वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असल्यास..
 रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास..
 आपण पूर्णपणे निरोगी असल्यास..
 दर ३ महिन्यांनी आपण रक्तदान करावे.
 जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात आपण रक्तदान करू शकता.

रक्तदान कोण करू शकत नाहीत ?

 मागील ३ दिवसांत कोणतेही पतिजैविक औषध घेतले असल्यास.
 मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास.
 मागील १ वर्षात विषमज्वर, काविळ किंवा श्वानदंश होवून रेबीजची लस घेतली असल्यास.
 ६ महिन्यापूर्वी आपली मोठी शस्त्रकिया झाली असल्यास.
 गर्भवती महिला, महिलेला १ वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास.

कायमचे बाद रक्तदाते :-

 कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, काविळ (ब, क प्रकारची), एड्स, मुत्रिपड रोग, यकृताच्या व्याधी असल्यास.

रक्तदानाचे फायदे :
 रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, काविळ (ब, क पकारची), मलेरिया)
 वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.
 रक्तगट व हिमोग्लोबीनच्या पमाणाबाबत माहिती मिळते.
 बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
 नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग पतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.

 नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे पमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय, यकृता सारखे अवयव स्वस्थ राहतात.
रक्तदाता कार्ड – स्वेच्छेने रक्तदान करणा-या पत्येक रक्तदात्याला लगेच पमाणपत्र व कार्ड दिले जाते. हया कार्डावर रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते.

 रुग्णाचे प्राण वाचविल्यामुळे आत्मिक समाधान मिळते. तसेच ३ रुग्णांचे प्राण  वाचविल्याचा पण आनंद होतो.

सामाजिक कर्तव्य : – ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदान आपल्याला मिळवून देते.

समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण रक्तदान यज्ञात एक स्वेच्छा रक्तदाता म्हणून सहभागी व्हावे, तसेच आपल्या नातेवाईक व मित्र परिवारालाच प्रवृत्त करावे.

रक्तदान – गरसमजुती आणि वास्तविकता :

 रक्तदानामुळे अशक्तपण किंवा चक्कर किंवा त्रास होतो.
नाही. आपल्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते त्यातील ३५० मि.ली. रक्त म्हणजे फक्त ५ टक्के रक्त रक्तदानाद्वारे रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिका-याकडून योग्य तपासणी नंतरच स्विकारले जाते. योग्य वजन, वय, आरोग्य संबंधीचे सर्व पश्न विचारुन व हिमोग्लोबीन, रक्तदाब, नाडी तपासणीनंतरच रक्तदाता रक्तदान करू शकतो व रक्तदानाच्या वेळी किंवा नंतर अशक्तपणा येण्याची शक्यता नसते. रक्तदानानंतर आपण दैनंदिन कार्य नेहमीसारखे करु शकता. रक्तदात्याच्या सामान्य आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही.

 रक्तदान सुरिक्षत नाही.

नाही. दान केलेले रक्त केवळ २४ तास ते ७ दिवसात नैसर्गिकरित्या भरून येते. रक्तदानासाठी वापरले जाणारे साहित्य पूर्णपणे र्निजतूक केलेले असते व एकदाच वापरून नष्ट केले जाते. रक्तदान पकियेत रक्तदात्याची सुरक्षितता काटेकोरपणे पाळली जाते, त्यामुळे कोणतीही इजा अथवा आजार होण्याची संभावना देखील नसते. रक्तदान हे संपूर्णपणे सुरक्षित आहे.

 रक्तदानासाठी खूप वेळ लागतो.

नाही, रक्तदानासाठी फक्त १० ते १५ मिनिटे लागतात. सर्व तपासण्या रक्तदान, अल्पोपहार या प्रकियांसाठी काही मिनिटे लागतात. पण ही काही मिनिटे एखाद्याचे प्राण वाचवू शकतात.

 रक्तदानाच्या वेळेस वेदना होतात.

नाही, रक्तदान वेदनारहित व आनंददायी आहे. कोणत्याही दडपणाखाली न राहता हसतमुखाने सहज रक्तदान करता येते.

 रक्तपेढीत रुग्णाला विकले जाते.

नाही, राज्य रक्त संक्रमण परिषदेने ठरवून दिलेल्या दरातच रुग्णाला रक्त मिळते. रक्तदात्याच्या रक्ताच्या तपासणीसाठी लागणारा खर्च प्रामुख्याने यात समाविष्ट आहे. रक्तपेढी ना नफा ना तोटा या तत्वावर चालते. आपले फक्त ३५० मिली रक्त आणि १५ मिनिटे, १ ते ३ रुग्णांना जीवनदान देऊ शकतात! अशापकारे १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान नियमित दर तीन महिन्यांनी ऐच्छिक रक्तदान केल्यास किमान १२ रुग्णांचे प्राण  वाचविण्याचे महान कार्य आपण करू शकतो.

Requires voluntary blood donation
थोडे नवीन जरा जुने