म्हातारपण रोखण्यात धावणे व पोहणे ठरते जास्त प्रभावी !


व्यायामामुळे शरीर आणि मन दोघांचेही आरोग्य टिकवून ठेवले जाऊ शकते. नियमित व्यायामाद्वारे शरीरावरील म्हातारपणाचा प्रभावही कमी केला जाऊ शकतो. एका ताज्या अद्यययनातून हा दावा करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांना त्यात असे दिसून आले की, वजन उचलणे आणि पुश-अप्ससारख्या घाम काढणाऱ्या व्यायामाच्या तुलनेत धावणे, पोहणे आणि सायकल चालविणे आदींसारखा सामान्य व्यायामामुळे म्हातापणाचा प्रभाव कमी करण्यास मदत मिळू शकते. 


जर्मनीतील लिपजिंग युनिव्हिर्सिटीतील शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, या अध्यययनादरम्यान विविध प्रकारच्या व्यायामांचा मानवाच्या शरीरातील पेशींवर पडणाऱ्या प्रभावाचा विचार करण्यात आला. त्या असे आढळून आले की, धावणे आणि पोहण्यासारखा हलका व्यायाम आणि हायली इंटेंसिटी इंटर्व्हल ट्रेनिंगमुळे पेशी कमजोर होण्याची प्रक्रिया धिमी केला वा पालटली जाऊ शकते. दुसरीकडे वजन उचलणे व पुश-अप्ससारख्या जोर लावल्या जाणाऱ्या व्यायामात हा प्रभाव पाहण्यास मिळत नाही. या अध्ययनात सहभागी केलेल्या २६६ लोकांंची तीन गटांमध्ये विभागणी करून या व्यायामप्रकारांचा प्रभाव जाणून घेण्यात आला.

Running and swimming is more effective at preventing old age
थोडे नवीन जरा जुने