त्वचा सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही घरगुती मेकअप रिमूव्हर वापरल्यास तुम्हाला फायद्याचे ठरू शकते
चेह-यावर जास्तकाळ मेकअप राहिल्याने त्वचेवरील छिद्रे बंद होतात. त्यासाठी ब-याच महिला चेह-यावरचा मेकअप कढण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात.
महिलांना मस्करा आणि आयलायनर काढण्यासाठी बराच वेळ लागतो. जास्तवेळ मेकअप चेह-यावर राहिल्यास केमिकल्समुळे चेह-यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

तुमची त्वचा सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही घरगुती मेकअप रिमूव्हर वापरल्यास तुम्हाला फायद्याचे ठरू शकते.

1. कोकोनट ऑइल -
नारळाच्या तेलाचा वापर तुम्ही रिमूव्हर, मॉयश्चरायझर आणि लिपबाम म्हणून करू शकता. या तेलाने तुम्ही क्लिजिंगदेखील करू शकता. मेकअप काढल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. तुम्ही या तेलाचा वापर करून वॉटरप्रुफ मेकअपदेखील काढू शकता.
जाणून घ्या, सोप्या घरगुती रिमूव्हर्स बनवण्याच्या पद्धती...

2. ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल आणि पाणी एकत्र करून कापसाने चेह-यावर लावावे. ऑलिव्ह ऑइलने चेह-यावरील मेकअपच नाही तर त्वचेची जळ-जळ कमी करण्यास मदत करते. हे ऑइल ऍन्टी-एजिंग सारखे काम करते.
3. काकडी -

काकडी खाण्यासाठी सगळ्यांनाच आवडते. पण काकडीचा आणखी एक गुणधर्म आहे. काकडीचा तुम्ही मेकअप रिमूव्हर म्हणूनही वापर करू शकता. काकडी किसून त्याची पेस्ट बनवावी. तुम्ही ही पेस्ट क्लींजर म्हणून चेह-यावर लावू शकता. याने त्वचेची जळ-जळ कमी होण्यास मदत होते. ही पेस्ट लवल्यानंतर तुम्हाला मेकअप काढण्यास त्रास होत असल्यास ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडे दूध टाकावे.
4. दही

चेह-यावर दही लावल्याने त्वचा मॉयश्चराइज़ होते. दह्याने त्वचा स्वच्छ होते. प्लेन दह्यात कापूस भिजवून चेह-यावर सर्कुलर मोशनमध्ये फिरवावे. हे लावल्यानंतर चेहरा ठंड पाण्याने धुवावा.


5. जोजोबा ऑइल आणि व्हिटॅमिन ई ऑइल

जोजुबा ऑयल ह्यूमन बॉडीतील निघणा-या सीबम सारखे असते. व्हिटॅमिन ई मध्ये त्वचेला कॉसमॅटिक्स प्रोडक्टमधील असणा-या केमिकल्सशी लढण्याचे ऍन्टी -ऑक्सीडेंट असतात. हे दोन्ही चेह-याला मॉयश्चराइज करण्यास मदत करतात. 60 मि.ली. जोजोबा ऑइलमध्ये एक व्हिटॅटमिन ई कॅप्सूल टाका. तुम्ही तयार केलेले हे रिमूव्हर गडद रंगाच्या बाटलीत बंद करून ठेवा आणि लागेल तसे वापरा. हे ऑइल तुम्ही वॉटरप्रूफ मस्कारा, लिक्विड आयलायनर आणि ब्लश काढण्यासाठी वापरू शकता.


6. कोकोनट,ऑलिव्ह ऑइल आणि बेबी शॅम्पू

हे एक इफेक्टिव मेकअप रिमूव्हर आहे. हे लावल्याने तुम्ही कोणत्याही प्रकारचा वॉटरप्रूफ मेकअप काढू शकता. हे तयार करण्यासाठी एक कप पाण्यात 8 छोटे चमचे ऑलिव्ह अथवा कोकोनट ऑइल टाकावे. यामध्ये अर्धा मोठा चमचा बेबी शॅम्पू टाकावा. एकत्र केल्यानंतर एका बाटलीत टाकून चांगल्या प्रकारे हलवावे.
थोडे नवीन जरा जुने