सावधान : जेवणानंतर लगेचच झोपताय ? मग हे वाचा
अनेकदा केवळ रात्रीच अनेकांना मनापासून जेवण्यासाठी शांत वेळ मिळतो. रात्रीच्यावेळी चरबी वाढविणारे आणि कार्बोहायड्रेटस असणारे पदार्थ खाल्ल्यावर लगेच झोपणे अतिशय हानिकारक असते. ज्यांना जेवणानंतर लगेचच झोपण्याची सवय असते त्यांची पचनक्रिया योग्य पद्धतीने होत नाही. तसेच या लोकांना याशिवायही आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात, कोणत्या ते पाहूया…

झोपेचे वेळापत्रक बदलते
जेवण झाल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुरु असते. त्यामुळे शरीर काही काळ शांत नसते. अशावेळी झोपल्यास सुरुवातीला शांत झोप आल्यासारखे वाटते. मात्र ही झोप तात्पुरत्या स्वरुपाची असते. रात्रभरा लागणारी झोप गाढ आणि शांत नसते. त्यामुळे झोपेत अडथळे येतात आणि शारीरिक स्वास्थ्य राखणे अवघड होते.

पचनक्रियेत अडचणी येतात
आपण झोपतो तेव्हा गुरुत्वाकर्षण होऊ शकत नाही. पचन होण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची आवश्यकता असते. उभे असल्यास ही क्रिया योग्य पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच झोपणे टाळावे. असे वारंवार झाल्यास पचनक्रिया कायमसाठी बिघडते आणि त्याचा परिणाम म्हणजे हृदयाच्या अडचणीही निर्माण होऊ शकतात.

शरीरातील साखरेची पातळी वाढते
मधुमेह असणारे लोक जेवण झाल्याझाल्या लगेचच झोपत असतील तर त्याच्या रक्तातील साखरेच्या पातळीत चढउतार होतात. त्यामुळे मधुमेहींनी जेवणानंतर किमान काही शारीरिक क्रिया करणे गरजेचे आहे. अन्यथा रक्तातील स्खरेचे प्रमाण वाढते जे आरोग्यासाठी धोक्याचे लक्षण असते.थोडे नवीन जरा जुने