म्हणून शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ जरुर फोडला जातो




हिंदू संस्कृतीमध्ये नारळाचे महत्वपूर्ण स्थान आहे. कुठलंही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ जरुर फोडला जातो. कोणत्याही देवी-देवताची पूजा नारळा शिवाय अपूर्ण मानली जाते. मात्र, कुठलंही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ का फोडला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला माहिती नाहीये तर काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, शुभ कार्य करताना नारळ का फोडतात ते…

नारळ वरुन जितका कठोर असतो तितकाच सौम्य आतमध्ये असतो. नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. शुभ कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी नारळ फोडण्याची प्रथा प्रामुख्याने हिंदू धर्मात दिसून येते. तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानांमध्ये नारळ ठेवून त्याची पूजा वास्तुशांती वेळी केली जाते. सुवासिनींची ओटी नारळाने भरतात. एखाद्या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करताना नारळ दिला जातो.

असे मानले जाते की, भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता त्यावेळी सोबत तीन गोष्टी आणल्या होत्या लक्ष्मी, नारळाचे झाड व कामधेनु. यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश तीनही देवांचा वास मानला गेला आहे.

ताज्या नारळाची मलई खाल्ल्यास दर दिवसाला शरीराला आवश्यक असणारं मँगेनीज मिळतं. या मलईत १५ टक्के पोटॅशिअम असतं जे आपले स्नायू, हाडं आणि पचनसंस्थेला कार्यरत ठेवतं. नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम आणि क्लोरीन असते जे आईच्या दुधासमान असते. असे म्हटले जाते की, नारळ खाल्याने शारीरिक दुर्बलता कमी होते.

नारळाला साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. देवाला नारळ अर्पण केल्यास पैशासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. तसेच घरामध्ये विधि-वत पूजा करून हे नारळ ठेवले तर धनामध्ये वृद्धी होते.

विविध प्रकारच्या भाज्यांमध्येही नारळ किसून घालतात ज्यामुळे भाज्या चवदार होतात. नारळाच्या करवंटीपासूनही अनेक वस्तू बनवतात.
थोडे नवीन जरा जुने